पाच लाखांची वाहने अन्‌ सात हजाराची वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:41 IST2021-03-04T04:41:16+5:302021-03-04T04:41:16+5:30

अक्कलकोट : मैंदर्गी-दुधनी रोडवर एका ट्रॅक्टरसह वाळू भरून जाणारा टेम्पो पकडून पोलिसांनी पाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. दोघांविरुद्ध ...

Five lakh vehicles and seven thousand sand seized | पाच लाखांची वाहने अन्‌ सात हजाराची वाळू जप्त

पाच लाखांची वाहने अन्‌ सात हजाराची वाळू जप्त

अक्कलकोट : मैंदर्गी-दुधनी रोडवर एका ट्रॅक्टरसह वाळू भरून जाणारा टेम्पो पकडून पोलिसांनी पाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मैंदर्गी-दुधनी रस्त्यावरून मंगळवारी (दि. २) दुपारी तीन वाजता एक टेम्पो आणि एक ट्रॅक्टर (केए २७, टीबी ३३००) ही दोन वाहने अवैध वाळू भरून निघालेली होती. खबऱ्याच्या माहितीनुसार अक्कलकोट पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

----

वाहन जागेवर सोडून चालकाने काढला पळ

या कारवाईत पोलीस शिपाई राऊत, पोलीस नायक कोळी यांनी ट्रॅक्टर अडवून चालकाकडे चौकशी केली असता वाहनातील वाळू ही चोरट्या मार्गाने आणल्याचे उघड झाले. चौकशीदरम्यान चालकाने वाहन जागेवर सोडून पळ काढला. या कारवाईत सात हजारांच्या एक ब्रास वाळूसह पाच लाखांची दोन वाहने जप्त केली. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

----

--

Web Title: Five lakh vehicles and seven thousand sand seized