शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील ‘त्या’ पाच निराधार कन्यांना मिळाला आधार!, शैक्षणिक, धान्याची मदत : ‘सिध्देश्वर’चे माजी विद्यार्थी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:33 IST

पित्यानेच मातेचा खून केला... पिता सध्या जन्मठेप भोगतोय... ज्यांचा आधार होता, त्या सत्तरवर्षीय आजोबांनीही दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनांमुळे बोराळे (ता. मंगळवेढा) येथील वाघमारे यांच्या घरातील निराधार झालेल्या पाच शाळकरी कन्यांना सिद्धेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने मदतीचा हात दिला

ठळक मुद्देपाच शाळकरी कन्यांना सिद्धेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने मदतीचा हात दिला

 

रवींद्र देशमुखसोलापूर दि १८ : पित्यानेच मातेचा खून केला... पिता सध्या जन्मठेप भोगतोय... ज्यांचा आधार होता, त्या सत्तरवर्षीय आजोबांनीही दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनांमुळे बोराळे (ता. मंगळवेढा) येथील वाघमारे यांच्या घरातील निराधार झालेल्या पाच शाळकरी कन्यांना सिद्धेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने मदतीचा हात दिला असून, या मुलींचा सर्व शैक्षणिक खर्च आणि वर्षभर पुरेल इतक्या सर्व प्रकारच्या धान्याचा खर्च या संघटनेने उचलला आहे.बाबुराव वाघमारे या बोराळेतील इसमाने आपणास सलगपणे पाच मुलीच झाल्याबद्दल दोन वर्षांपूर्वी पत्नीचाच खून केला. या खुनाबद्दल बाबुरावला जन्मठेपेची शिक्षा झाली. सहावीत शिकणारी मंजुळा, पाचवीतील संजीवनी, तिसºया इयत्तेत जाणारी मुक्ता आणि नीरा व अगदीच लहानगी पहिल्या वर्गातील मंगलाला सांभाळण्याची जबाबदारी आजोबा दामोदर वाघमारे आणि आजी जनाबाई यांच्यावर आली. मुलगा बाबुरावला जन्मठेप झाल्याचे समजल्यावर आता या वार्धक्यात या मुलींना कसे सांभाळायचे? या चिंतेने दामोदर वाघमारे यांनी आत्महत्या केली. मुली पुरत्या निराधार झाल्या.सिद्धेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांना या दुर्दैवी घटनेची माहिती माध्यमांमधून समजताच संघटनेचे अध्यक्ष देविदास चेळेकर, खजिनदार महिंद्र सोमशेट्टी, संजीव रंगरेज, भारत जाधव, अनिल शहा आदींनी मंगळवेढ्याच्या शशिकांत चव्हाण यांच्या मदतीने बोराळे गाठले. गावकºयांशी संवाद साधून वाघमारे यांच्या पाच मुलींचे पालकत्व घेण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलींच्या आजी जनाबाई यांनी होकार दिल्यानंतर माजी विद्यार्थी संघटनेने निधीची जमवाजमव केली. पुढील आठवड्यात या निराधार मुलींना संघटनेच्या वतीने शैक्षणिक व अन्नधान्यासाठी आर्थिक मदत देण्यात येईल, असे चेळेकर यांनी सांगितले.----------------माजी विद्यार्थ्यांचे कार्यमाजी विद्यार्थ्यांची संघटना ही मुख्यत्वे ‘गेट टुगेदर’ आयोजित करण्यासाठी स्थापन केलेली असते; पण सिद्धेश्वर हायस्कूलमधील १९८७-८८ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे. सोलापुरात जुनी हातगाडी ओढून वस्तूंची वाहतूक करणाºया वृद्ध महिलांना संघटनेच्या वतीने नवीन हातगाड्या खरेदी करून दिल्या. शिवाय रविवार पेठेतील गोपाळ प्रशाला ही शाळा दत्तक घेऊन इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी केली. विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य दिले. आमचे सामाजिक कार्य असेच सुरू राहील, असे अध्यक्ष देविदास चेळेकर यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थी