शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मासेमारी संकटात; उजनी बॅकवॉटरला मानवनिर्मित प्रदूषणाचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 13:08 IST

आरोग्यास अपाय; पाण्याला दुर्गंधीयुक्त हिरवा तवंग; भीमा नदीचे सौंदर्य प्रदूषणाच्या फेºयात

ठळक मुद्देउजनी धरण बॅकवॉटरवर दुर्गंधीयुक्त हिरवट तवंग हिरवट तवंग आल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक बनलेउजनी धरणमधील पाण्याला मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्याने गटारगंगेचे स्वरूप

कोर्टी: सोलापूर- पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाºया भीमा नदीवरील आणि उजनी धरण बॅकवॉटरवर दुर्गंधीयुक्त हिरवट तवंग आल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक बनले आहे. एकेकाळी स्वच्छ, निर्मळ असलेल्या भीमा नदीचे सौंदर्य प्रदूषणाच्या फेºयात अडकले आहे. उजनी धरणमधील पाण्याला मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्याने गटारगंगेचे स्वरूप आले आहे, हे धोकादायक असल्याचा सूर पर्यावरण तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.

उजनी जलाशयात पुणे जिल्हा व परिसरातील वापरलेले, सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतीमधील खराब केमिकलयुक्त पाणी, कोणतीही प्रक्रिया न करता थेट येत असल्याने दूषित झालेले पाणी जलाशयामधून बहुतांश गावांत सार्वजनिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत पिण्यासाठी उचलले जाते. यामुळे या पाण्यात असणाºया  विविध जलचरांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात नसल्याची खंत निसर्गप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. भीमा नदीच्या सौंदर्यावर प्रदूषणाचा घाला घालणाºया अवैध व्यवसायांवर वेळीच निर्बंध घालावे, अशी मते व्यक्त होऊ लागली आहेत. 

नदीवरील मासेमारी संकटातसबंध भीमा नदी पात्रात मासेमारी हा मोठा व्यवसाय चालतो. मासेमारीचा व्यवसाय करणाºयांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मासेमारी करण्यासाठी पाण्यात उतरले असता या विषारी पाण्यामुळे अक्षरश: मानवी शरीराला खाज येत आहे. असे असताना उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांना आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करावी लागते, अशी व्यथाही मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली. 

पक्ष्यांच्या प्रजातींवर परिणाम

  • - भीमा नदीच्या अथांग पात्रात विविध जातींच्या पक्ष्यांची कायम रेलचेल असते. विशेषत: हिवाळ्याच्या सुरुवातीला विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. त्याचबरोबर अनेक स्थानिक पक्षीही नदीकाठावर आपली उपजीविका करतात.  मात्र दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे विविध जातीच्या पक्ष्यांचा वावर कमी झाला आहे. विदेशी पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे पर्यावण अभ्यासक  डॉ़ अरविंद कुंभार यांनी सांगितले.
  • जलीय परिसंस्था धोक्यात
  • - जमिनीप्रमाणे पाण्यातही अनेक परिसंस्था असतात. पाण्यात जीवन जगणाºया अनेक वनस्पती, पाण्याच्या तळाशी  राहणारे अनेक जलचर प्राणी, विविध जातींचे मासे , खेकडे, झिंगे , कासव असे अनेक जीव जलीय परिसंस्था अंतर्गत येतात. दुर्गंधीयुक्त हिरवट पाण्यामुळे जलीय परिसंस्था धोक्यात आलेल्या आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणी