शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

Teachers Day; पहिली नोकरी शिक्षकाची, नंतर अधिकारी झालो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:34 IST

कॉम्प्युटर इंजिनिअर असलेले मनोज पाटील शाळेतील शिक्षकांच्या प्रेरणेमुळे स्पर्धा परीक्षेनंतर पोलीस खात्यात रुजू  झाले

ठळक मुद्दे- मनोज पाटील सध्या सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत- मनोज पाटील यांनी पोलीस अधिक्षक पदाचा पदभार घेतल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदे हद्दपार झाले आहेत- मनोज पाटील यांच्या कामाची पध्दत वेगळी असून ग्रामीण पोलीसांची मान उंचाविणारी कार्यशैली त्यांची आहे

संताजी शिंदे सोलापूर : वडील कृषी विभागात शासकीय नोकरदार होते. साताºयातील सैनिक स्कूलमध्ये शिकत असताना तेथील शिक्षकांमुळे मला शासकीय नोकरीची आवड निर्माण झाली. शाळेत असताना खेळ, व्यायाम आणि अभ्यास या गोष्टी नियमितपणे होत होत्या. होस्टेलवर राहिल्याने मी शिक्षकांच्या शिस्तीत वाढलो. शिकवणाºया शिक्षकांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव पडला. सैनिक स्कूलमध्ये १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आणि मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तीन वर्षे शिक्षकाची नोकरी केली. नंतर मी पोलीस अधिकारी झालो. 

कॉम्प्युटर इंजिनिअर झाल्यानंतर माझ्यासोबतचे सर्व सहकारी मित्र मोठ्या पगारावर अमेरिका, इंग्लंड आदी विविध देशात नोकरीसाठी गेले. ८0 टक्के मित्र परिवार आज परदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहे. मात्र मी सैनिक शाळेत शिकल्याने माझ्या मनावर शासकीय नोकरीचा प्रभाव होता. सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये मी दोन वर्षे शिक्षक म्हणून काम केले. नंतर मिरज येथे जाऊन सव्वा वर्ष विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले. यूपीएससी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना मी स्वत: अभ्यास केला. १९९८ साली मी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस खात्यात अधिकारी पदावर रूजू झालो. अधिकारी नसतो तर आज शिक्षक राहिलो असतो.  

जेव्हा शिक्षक मित्र बनतात...शाळेत आम्ही सर्व विद्यार्थी हुशार होतो, आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक हे प्रचंड शिस्तीचे होते. त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, राहणीमान आम्ही निरखून पाहत होतो. पी.टी.चे घाडगे सर हे शिस्तीचे होते. मात्र अन्य वेळी ते चांगले मित्र होते. आम्हाला वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत असत. एस.आर.एस. चौहान, प्रिन्स सर हे शिक्षक आम्हाला वारंवार मार्गदर्शन करीत असत.  मी प्रशासकीय सेवेतच जावे, अशी वडील गोविंद पाटील यांची इच्छा होती. मी परदेशात जाऊन नोकरी केली असती. मात्र मला भारतातच राहून आर्मी, एअरफोर्स किंवा प्रशासकीय सेवा करायची होती. अधिकारी म्हणून काम करीत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून एकप्रकारची समाजसेवा करण्यात मला समाधान मिळते. कोणावरही अन्याय होऊ नये, अशी माझी धारणा असते. कायद्यासमोर कोणी मोठा नाही. समाजातील गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, हाच माझा प्रयत्न असतो.

शिक्षकाबद्दल वापरला होता अपशब्द...शाळेमध्ये माझ्या समविचारी मित्रांचा एक ग्रुप होता, आम्ही सर्व जण नेहमी एकत्र राहत होतो. शाळेत एका मध्यांतरामध्ये आम्ही एकत्र होतो, तेव्हा चेष्टेत एका शिक्षकाबद्दल मी अपशब्द वापरला. नेमकं आमचं हे बोलणं  शिक्षकांनी ऐकलं, त्यांनी मला वर्गात बोलावून घेतलं. खूप भीती वाटली होती, मात्र त्यांनी शांतपणे आम्हाला समज दिली. भवितव्याची जाणीव करून दिली, त्यानंतर आम्ही त्यांची माफी मागितली. नंतर तशी चूक केली नाही

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसTeachers Dayशिक्षक दिन