प्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:08 PM2018-06-23T12:08:38+5:302018-06-23T12:11:49+5:30

राज्यात आजपासून प्लस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे़ प्लस्टिक पिशवी वापरणाºयांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाईचे सुत्र सुरू आहे़

The first action taken to ban plastisol in Solapur | प्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात

प्लस्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापूरात

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयाने हद्दीत मोहिम उघडली़ पहिला दणका सोलापूर-मंगळवेढा रोडवरील रिलायन्स मार्केटलाशहरातील झोन अधिकाºयांबरोबर आरोग्य खात्याचे पथक

सोलापूर : राज्यात आजपासून प्लस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे़ प्लस्टिक पिशवी वापरणाºयांवर राज्यात ठिकठिकाणी कारवाईचे सुत्र सुरू आहे़ याचअनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयाने हद्दीत मोहिम उघडली़ पहिला दणका सोलापूर-मंगळवेढा रोडवरील रिलायन्स मार्केटला देण्यात आला़ 
प्लस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेने शहरातील झोन अधिकाºयांबरोबर आरोग्य खात्याचे पथक दिले़ शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून दुकानांची तपासणी सुरू झाली़ झोन कार्यालय क्रमांक ६ चे अधिकारी आदलिंगे यांच्या पथकाने सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील रिलायन्स मार्केटची तपासणी केली़ या तपासणीत कॉऊन्टरच्या ड्रावरमध्ये प्लस्टिक पिशव्यांचा गठ्ठा आढळल्याने ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला़ त्यानंतर याच मार्गावरील साई सुपर मार्केटची तपासणी केल्यावर तेथेही प्लस्टिकची कॅरीबॅग आढळल्या़ बाजुच्या बेकरीतही कॅरीबॅग आढल्यानंतर प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड करून पिशव्या जप्त करण्यात आल्या़ झोन कार्यालय क्रमांक १ चे अधिकारी मोहन कांबळे यांनी नवीपेठेतील नामदेव चिवडा या दुकानाची तपासणी केल्यावर तेथेही कॅरीबॅगचा साठा आढळला़ याप्रकरणी दुकान चालकास दंड करण्यात आला़ याचबरोबरच चाटी गल्लीतील मिठाई दुकानावर कारवाई करण्यात आली़ 
शहरात दुकानांची तपासणी वेगाने सुरू असून अनेक दुकानदारांनी प्लस्टिक पिशव्यांचा साठा नष्ट न करता जवळ बाळगल्याचे दिसून आले़ याचा फटका या दुकानदारांना बसला आहे़ चौपाड विठ्ठल मंदीराजवळ प्लस्टिक पिशव्या व इतर वस्तु विक्रीची दुकाने आहेत़ या दुकानातील साठ्यांची तपासणी करण्यात येत आहे़ सायंकाळपर्यंत मोठी कारवाई अपेक्षित असल्याचे सोलापूर महानगरपािलकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले़

Web Title: The first action taken to ban plastisol in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.