शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कलकर्जाळ येथे गोळीबार; अवघ्या २७ मिनिटात आरोपीला घेतले मंद्रुप पोलिसांनी ताब्यात

By appasaheb.patil | Updated: September 14, 2022 18:58 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ येथे एका अज्ञात वाहनात येऊन अनोळखी व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना बुधवार १४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, गोळीबार करून गाडीतून पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी मंद्रुप पोलिस ठाण्याचे पोलिस कर्नाटकातील विजयपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळालेली अशी की, अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ येथे गोळीबार झाला. ही घटना अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलीस नियंत्रण कक्षातून मंद्रूप पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गोळीबार करणारा आरोपी  काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीतून पसार झाले असून ती गाडी कर्नाटकच्या दिशेने गाडी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे हे तातडीने आरोपीचा पाठलाग करण्यासाठी विजापूरच्या दिशेने रवाना झाले असून सोलापूर- विजयपूर महामार्गावरील टोल नाके आणि पोलीस स्टेशनला सतर्कतेच्या सूचना सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. 

मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी वाहनाचा पाठलाग करीत इंडीच्या जवळ आरोपीला धाडसाने पकडले नियंत्रण कक्षातून माहिती मिळाल्यापासून अवघ्या २७ मिनिटात आरोपीला ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांचे घटनाक्रमाकडे लक्ष होते.

टॅग्स :Solapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोटCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस