आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : सोलापूरपासून जवळ असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील हातमाग कारखान्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली़ या आगीत ३० लाखांचे नुकसान झाले़ या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळला भेट देऊन पाहणी केली़ अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला़ यात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे़ याबाबत अक्कलकोट पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील मल्लप्पा निरोळी यांच्या हातमाग कारखान्यास भीषण आग लागली़ या आगीत सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले़ यात संसारोपयोगी वस्तु, टॉवेल, कांबळ, माग जळून खाक झाले आहे़ या आगीचे लोण परिसरात पसरले होते़ अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी शुक्रवारी रात्रभर आग विझविण्याचा प्रयत्न केला़ यात प्रामुख्याने सोलापूर महानगरपालिका, आळंद व कर्नाटकच्या अग्निशामक दलाचे विशेष परिश्रम घेतले़ ही आग विझविण्यासाठी तब्बल सात तास लागल्याचे पोलीसांनी सांगितले़
वागदरी येथील हातमाग कारखान्याला लागली भीषण आग, ३० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:04 IST
सोलापूरपासून जवळ असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील हातमाग कारखान्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली़ या आगीत ३० लाखांचे नुकसान झाले़
वागदरी येथील हातमाग कारखान्याला लागली भीषण आग, ३० लाखांचे नुकसान
ठळक मुद्देकोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आलीसंसारोपयोगी वस्तु, टॉवेल, कांबळ, माग जळून खाक झालेआग विझविण्यासाठी तब्बल सात तास लागल्याचे पोलीसांनी सांगितले़