शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विजेची तार तुटल्याने घर आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:59 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील घटना; भर उन्हात कुटुंब झाले बेघर

ठळक मुद्देविजेची तार तुटून घरावर कोसळल्याने संपूर्ण घर जळून खाकया आगीत सुमारे दोन लाखांची हानी झाली, मात्र  कोणतीही मनुष्यहानी झाली नाहीघराला आग लागताच  कासेगावचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले

सोलापूर : विजेची तार तुटून घरावर कोसळल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना सोमवारी दुपारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे घडली. भर उन्हात बेघर होण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली.

कासेगाव येथील बाळासाहेब चौगुले यांच्या घरावरून महावितरणची मेन लाईन गेली आहे. दुपारच्या दरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने या  मेनलाईनची तार तुटली आणि ती बाळासाहेब चौगुले यांच्या घरावर पडली. पत्रे आणि छपराचे घर असल्यामुळे ठिणगी पडताच छपराने तातडीने पेट घेतला. आजूबाजूच्या लोकांनी आज विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. काही मिनिटात घर होत्याचे नव्हते झाले. 

घरातील अन्नधान्य, कपडेलत्ते, संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत सुमारे दोन लाखांची हानी झाली. मात्र  कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. भर दुपारी ही घटना घडल्याने चौगुले कुटुंबीयांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. यापूर्वी तुकाराम जाधव यांच्या घरावरही विजेची तार तुटून पडली होती.

चौगुले यांच्या घराला आग लागताच अमोल जाधव,  सोपान चव्हाण, आप्पा चौगुले,लखन वानकर, अनिल शिंदे, रणजित चौगुले, गोपाल चव्हाण, बालाजी जाधव घटनास्थळी धावून आले. त्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.या युवकांनी आपद्ग्रस्त चौगुले कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले आणि त्यांना मदत मिळवून दिली.

पाण्याचे दुर्भिक्ष - घराला आग लागताच  कासेगावचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. आग विझवण्यासाठी भांडी, घागरी घेऊन धावले, पण गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने त्यांचा नाईलाज झाला. अन्यथा ही आग विझवणे शक्य झाले नसते.

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्रा