शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील कर्णिक नगरातील फटाके स्टॉलला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:50 IST

सोलापूर : सोलापूर शहरात असलेल्या कर्णिक नगर भागातील रिक्षा स्टॉपजवळील फटाके स्टॉलला आग लागली. या घटनेची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक ...

ठळक मुद्दे- फटाके स्टॉलला आग लागल्याने परिसरात भितीचे वातावरण- अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल- फटाक्याचे नुुकसान, जिवितहानी नाही

सोलापूर : सोलापूर शहरात असलेल्या कर्णिक नगर भागातील रिक्षा स्टॉपजवळील फटाके स्टॉलला आग लागली. या घटनेची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम वेगात सुरू असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे केदार आवटे, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर आदी उपस्थित आहेत. कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही, वेळेवर अग्निशामक दलाच्या गाड्या आल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी दिली.

पूर्व भागात वालचंद महाविद्यालय परिसरात असलेल्या कर्णिक नगरातील रिक्षा स्टॉपजवळील व्यंकटेश ईट्टम यांच्या फटाके स्टॉलला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील फटाक्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी अग्निशामक दलाला दिल्याने वेळेत अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  वेळेत आग विझविल्याने पुढील अनर्थ टळल्याने अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राDivaliदिवाळीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका