शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात हॉस्पिटलला आग; कर्मचाºयाने मारली खिडकीतून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:38 IST

शिंदे चौकातील घटना; अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी विझवली आग

ठळक मुद्दे- सोलापुरातील शिंदे चौकातील घटना- आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी- पोलीसांनी केला पंचनामा, तीन ते चार लाखांचे नुकसान

सोलापूर : दक्षिण कसबा शिंदे चौकातील मारूती टेळे संकुलात असलेल्या हॉस्पिटलला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. 

मारूती टेळे संकुलात डॉ. गिरीष वसंत काळे यांचे हॉस्पिटल व पॅथॉलॉजी आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पॅथॉलॉजीमध्ये विजेचा शॉटसर्किट झाला. विजेच्या ठिणग्यांनी पॅथॉलॉजीमध्ये आग लागली. आग लागल्याचे समजताच बाहेरील बाजुस असलेला कर्मचारी संकुलाच्या बाहेर पडला व त्याने अग्निशामक दलास पाचारण केले.

तत्काळ भवानी पेठ, रविवार पेठ आणि सावरकर मैदान येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. आगीत आतमधील मशिनरी, केमिकल, फर्निचर, खुर्च्या, टेबल, पीओपी आदी साहित्य जळुन खाक झाल्याचे निदर्शनास आले. आगीत साडे चार ते पाच लाखचे नुकसान झाले असण्याची शक्यता अग्निशामक दलाचे अधिक्षक केदार आवटे यांनी दिली. ---------आतील कर्मचाºयाने टाकली खिडकीतुन उडी- पॅथॉलॉजीमध्ये दोन कर्मचारी रात्री कामाला होते़ एक कर्मचारी बाहेर तर दुसरा पॅथॉलॉजीमध्ये झोपला होता. अचानक आग लागल्यानंतर आतील कर्मचाºयाला बाहेर पडता येत नव्हते. आग आणि धुरामुळे तो आतमध्ये गुदमरला होता. त्याने खिडकी उघडली व त्यातुन बाहेर उडी मारली. पहिल्या मजल्यावरून पडल्याने कर्मचारी जखमी झाला. 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसhospitalहॉस्पिटल