शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं; सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन नव्हे तर ऑनलाइनच होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:59 IST

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाने घेतला निर्णय; परीक्षा संचालक श्रेणीक शाह यांची माहिती

सोलापूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी दिली.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा संचालक शाह यांनी सांगितले. यानुसार आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे.

यामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सत्र एक व दोनच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतील. 26 एप्रिल 2021 पासून पारंपारिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील, अशी संभाव्य तारीख आहे. तर फार्मसी व इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या सत्र एक ते चारच्या परीक्षा 5 मे 2021 पासून सुरू होतील, अशी संभाव्य तारीख आहे.

ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांची प्रश्नपत्रिका ही 50 गुणांची असेल. त्यानुसार विद्यापीठ परीक्षा विभागाकडून रचना करण्यात येत आहे. अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, असे परीक्षा संचालक सीए शाह यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरexamपरीक्षाonlineऑनलाइन