शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी ठरले, डौलापूरचे भोयर दाम्पत्यांना मिळाला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 12:09 IST

कार्तिकी वारी; पंढरपुरात संचारबंदी; साधेपणाने होणार यात्रा

पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर (वय ५५ रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) या दाम्पत्यांची निवड झाली आहे.

उपमुख्यमंत्र्यांसोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे.

२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तासपहारा देणारे विणेकरी यांची उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण ६ विणेकांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीनेकवडुजी नारायण भोयर (वय ६४, रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांची दि.२२ नोव्हेंबर २०२० रोजी निवड करण्यात आली आहे.

कवडुजी नारायण भोयर हे मागील ९ ते १० वर्षांपासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वत: व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील ८ महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.

त्याप्रमाणे कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर ( वय ५५) दापत्याची कार्तिकी एकादशी दिवशी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या श्रीं विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी निवड करण्याबाबत मंदिर समितीचे सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अँड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी