शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सोलापूर जिल्ह्यातील ७९ अतिरिक्त शिक्षकांचे झाले समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 15:16 IST

सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून खासगी शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गुरुवारी मार्गी लागला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ...

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३० जणांना संधी मिळालीसोलापूर जिल्ह्यातील ५७ शिक्षक समायोजनासाठी पात्र ठरलेकन्नड माध्यमासाठी जागा रिक्त नसल्यामुळे दोन शिक्षकांचे समायोजन झाले नाही.

सोलापूर: गेल्या दोन वर्षांपासून खासगी शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गुरुवारी मार्गी लागला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत एकूण ७९ शिक्षकांना रिक्त पदांच्या जागेवर पदस्थापना देण्यात आली. यात पदसंख्या उपलब्ध नसल्यामुळे १७ जणांना पदस्थापना मिळू शकली नाही. त्यांना पुणे विभागाकडे पाठवण्यात येत असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यातील विविध खासगी शाळांमध्ये विविध कारणांनी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना सामावून घेण्यासाठी गुरुवारी बैठक पार पडली. यासाठी मराठी, कन्नड, उर्दू माध्यमातील शिक्षक यावेळी उपस्थित होते. यामध्ये बिगर अल्पसंख्याक शिक्षकांची संख्या ५९ होती. यामधील २७ जणांचे ज्या खासगी शाळांमध्ये रिक्त जागा आहेत अशा ठिकाणी त्यांना समायोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३० जणांना संधी मिळाली. असे ५७ शिक्षक समायोजनासाठी पात्र ठरले. कन्नड माध्यमासाठी जागा रिक्त नसल्यामुळे दोन शिक्षकांचे समायोजन झाले नाही.

अल्पसंख्याक विभागातून ३७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यातील २२ जणांची खासगी शाळांमध्ये वर्णी लागली. १५ पुन्हा अतिरक्त ठरले. जिल्ह्यात जिल्हा परिषद अथवा खासगी शाळांमध्ये कन्नड शिक्षकांच्या जागा शिक्षक नसल्याने येथे १५ जण अतिरिक्त ठरले. बिगर अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक या दोन्ही विभागातून अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांना पुणे विभागाकडे पदस्थापनेसाठी पाठवण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी राठोड यांनी स्पष्ट केले. सन २०१६-१७ आणि २०१७-१८ वर्षातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न जटिल बनला होता. वास्तविक २०१६-१७ च्या सेवक संचानुसार १३४ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यातील ९७ जणांचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागला होता. 

उर्वरित शिक्षक जाणार परजिल्ह्यात

  • - गुरुवारी पार पडलेल्या बिगर अल्पसंख्याक शिक्षक समायोजन प्रक्रियेमध्ये खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमासाठी ४७ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली, कन्नड माध्यमात ५ आणि उर्दू शाळेमध्ये ७ अशा एकूण ५९ शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागला. अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांना आता पुणे विभागाकडून जिथे रिक्त जागा असेल तेथे म्हणजे सोलापूर जिल्हा वगळता आंतरजिल्हा पदस्थापना घ्यावी लागणार आहे. 

अनेक दिवसांपासून प्रलंबित ठरलेला अतिरिक्त शिक्षक समायोजनाचा प्रश्न आता निकाली लागला आहे. जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर पदस्थापना दिली आहे. पदसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षकांची यादी पुणे विभागाकडे पाठवण्यात येतील.- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTeacherशिक्षक