शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पंपावर पेट्रोल भरा; सीडबॉल मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:19 IST

सोलापूर शहर पोलीस वेल्फेअर योजना; पर्यावरण रक्षणासाठीचे पाऊल; शहर पोलिसांचाही सहभाग

ठळक मुद्देअशोक चौक येथील आयुक्तालयाच्या शहर पोलीस पेट्रोल पंपावर सीडबॉलचे वाटपशासकीय पातळीवर जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतलेझाड लावल्यावर त्यासोबत सेल्फी पाठवणाºयाला शंभर रुपयांचे पेट्रोलही मोफत देण्यात येणार

सोलापूर : पर्यावरणाचे महत्त्व आता सर्वांना पटत आहे. यामुळे वृक्षारोपण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना, व्यक्ती, शासनाच्या वतीने पुढाकार घेत आहेत़ याचबरोबर विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. याच उपक्रमामध्ये आता शहर पोलीसही सहभागी झाले आहेत. अशोक चौक येथील आयुक्तालयाच्या शहर पोलीस पेट्रोल पंपावर सीडबॉलचे वाटप करण्यात येणार आहे.

शासकीय पातळीवर जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे लावण्यात येत असत़ यामुळे वृक्षांची संख्या वाढत आहे़ यामुळेच पोलीस आयुक्तालयाच्या अशोक चौक पोलीस पेट्रोल पंपावर आता पेट्रोल भरणाºया प्रत्येक ग्राहकाला सीडबॉलचे बॉक्स देण्यात येणार आहे़ यामध्ये विविध प्रकारच्या झाडांचे सीडबॉल आहेत़ यात बांबू, गुलमोहोर, आवळा, सुबाभूळ, सीताफळ, चिंच अशा वृक्षांचे सीडबॉल आहेत़ याचबरोबर हे झाड लावल्यावर त्यासोबत सेल्फी पाठवणाºयाला शंभर रुपयांचे पेट्रोलही मोफत देण्यात येणार आहे़  जनतेमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी, झाडांचे महत्त्व कळावे, यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे.

हे उपक्रम हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वतीने हाती घेण्यात आले आहेत. ‘पेड लगाओ पर्यावरण बचाओद’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ १ आॅगस्टपासून शहर पोलीस पेट्रोल पंपावर जवळपास नऊ हजार सीडबॉलचे वाटप करण्यात येत आहे़ यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत नागरिकांमध्ये व्यवस्थापक अविनाश घोडके, पोलीस हवालदार वसमाने, चन्नप्पा स्वामी, सचिन अंबलगी हे जागरुकता निर्माण करीत आहेत.

ग्राहकाला देणार बॉक्स- आमच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाºया प्रत्येक ग्राहकाला सीडबॉलचा एक बॉक्स देणार आहोत. या बॉक्समधील झाडे लावून त्या झाडासोबत सेल्फी घेऊन पाठवले तर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वतीने लकी ड्रॉद्वारे शंभर रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे़ ‘पेड लगाओ पर्यावरण बचाओ’ हा यामागचा मुख्य हेतू आहे, असे पोलीस निरीक्षक, मानवी संसाधन विभाग रविकिरण घोडके यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPetrol Pumpपेट्रोल पंपSelfieसेल्फी