खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST2021-02-05T06:43:48+5:302021-02-05T06:43:48+5:30

डिकसळ येथील संजय रंगनाथ खरात यांचा ट्रान्सस्पोर्टचा व्यवसाय आहे. सन २००७ साली त्यांनी मित्रांच्या ओळखीचे खासगी सावकार गौडाप्पा तुकाराम ...

Filed a crime against a private lender | खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

डिकसळ येथील संजय रंगनाथ खरात यांचा ट्रान्सस्पोर्टचा व्यवसाय आहे. सन २००७ साली त्यांनी मित्रांच्या ओळखीचे खासगी सावकार गौडाप्पा तुकाराम यमगर यांच्याकडून एप्रिल २०१० मध्ये दर महिन्याला १५ हजार रुपये व्याज देण्याच्या अटीवर ५ लाख रुपये घेऊन नोटरी केली होती. नोटरीत अटीचे पालन न झाल्यास तीन टँकर ताब्यात घेणार व संपूर्ण पैसे परत न केल्यास डिकसळ येथील नावे असलेली जमीन व घराचा ताबा त्याला देणार असे नमूद केले होते. त्यानंतर संजय खरात यांनी गौडाप्पा याच्याकडून आणखी ५ लाख रुपये व्याजाने घेतले. दरम्यान, गौडाप्पा याने वारंवार पैशासाठी तगादा लावला होता. त्याने जमीन खरेदी करण्यापूर्वी संजय खरात यांनी १० लाख रुपये व्याजासह परत केल्यास खरेदी केलेली जमीन त्यांना परत देण्याचे ठरले होते.

ऑक्टोबर २०१३ मध्ये ३२ महिन्याचे ९ लाख ६० हजार रुपये व्याज खरात यांना दिले व उर्वरित १० लाख रुपये घेऊन माझी जमीन मला परत खरेदी करून दे, असे गौडाप्पा यास विनंती केली. यावेळी त्याने मला सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जमिनीचे पैसे दे असे बजावले. तद‌्नंतर संजय खरात व गौडाप्पा यमगर यांच्यात समझोता होऊन खरात हे १५ लाख रुपये देण्यास तयार झाले. मात्र गौडाप्पाने व्याज व मुद्दल अशी २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्याद नमूद केले आहे.

Web Title: Filed a crime against a private lender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.