कर्जफेडीवरून गायी नेल्याप्रकरणी नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:48+5:302021-02-05T06:44:48+5:30

डोंगरगाव येथील कृषीविकास प्रोड्युसर कंपनीने फिर्यादी सोमनाथ सिध्देश्वर साखरे (वय ४०, रा. भाळवणी) यांच्या गटाला नाबार्डकडून सबसीडी देतो, असे ...

Filed a case against nine persons for taking cows on loan repayment | कर्जफेडीवरून गायी नेल्याप्रकरणी नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल

कर्जफेडीवरून गायी नेल्याप्रकरणी नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल

डोंगरगाव येथील कृषीविकास प्रोड्युसर कंपनीने फिर्यादी सोमनाथ सिध्देश्वर साखरे (वय ४०, रा. भाळवणी) यांच्या गटाला नाबार्डकडून सबसीडी देतो, असे म्हणून कंपनीचे मालक तुळशीदास कारंडे, विवेक खिलारे, जनार्धन गायकवाड, विशाल गायकवाड, देवा खिलारे, दादा माळी, प्रशांत कोरे, नागेश नरळे, वैशाली चंदनशिवे यांनी फिर्यादीकडून १०० व ५०० रुपयांचे कोरे स्टँप घेवून त्यावर सह्या घेतल्या. तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँक निंबोणी येथून गटाच्या नावे ७ लाख प्रत्येकी १ लाख ४० हजार एवढे कर्ज मंजूर करून घेवून फिर्यादी व फिर्यादीची आई यांना प्रत्येकी ६४ हजार ७५० एवढी रक्कम देवून आम्हा दोघांची कर्जातील गायी व स्वतःच्या दोन गायी कर्जफेडीच्या नावाने गायी नेवून फसवणूक केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Filed a case against nine persons for taking cows on loan repayment