शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेने केली पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 11:34 IST

विधानसभा अध्यक्षांनी आमदार राम कदमांवर कारवाई करण्याची केली मागणी

ठळक मुद्देकंगना रनौत यांनी महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होतीसंयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले त्यांचाही अपमान झाला शिवसेनेच्या वतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

सोलापूर : महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. 

कंगना रनौत यांनी महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले त्यांचाही अपमान झाला आहे. मुंबईमध्ये राहून करोडो रुपये कमवायचे, नावारूपास यायचे व त्याच महाराष्ट्राला व मुंबईला ड्रगमाफियाशी जवळीक ठेवून बेताल वक्तव्य करायचे. अशा व्यक्तींचा महाराष्ट्र शासनाने त्वरित बंदोबस्त केला पाहिजे. ९ सप्टेंबर रोजी मी मुंबईत येणार आहे, कोणाची हिंमत आहे, मला कोण आडवतंय मी पाहते, असे जाहीर आव्हान कंगनाने प्रशासनाला दिले आहे. मस्तवाल कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून वेळीच कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, विभागीय संघटक महेश धाराशिवकर, परिवहन सदस्य विजय पुकाळे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. -------------आमदार राम कदमवर कारवाई करावीभाजपचे आमदार राम कदम हे कंगना रनौत यांचे मानलेले भाऊ आहेत. त्यांनी कंगना रनौत यांची पाठराखण केली असून महाराष्ट्र व मुंबईची बदनामी करून सामाजिक शांतता बिघडवण्याचे हे षड्यंत्र आहे. या कृतीची दखल घेऊन शासनाने व विधानसभा अध्यक्षांनी राम कदम यांच्या सदस्यत्वाच्या बाबतीत कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरKangana Ranautकंगना राणौतShiv SenaशिवसेनाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस