शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब देण्यासाठी रुग्णास न पाठविणाºया कर्णिकनगरातील डॉक्टरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:36 IST

क्लिनिकची तपासणी; महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई

ठळक मुद्देकोरोनासदृश आजाराचे रुग्ण  खासगी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी जात आहेतउपचारानंतरही बरे होत नसल्याने इतर रुग्णालयांमध्ये फिरत आहेतया प्रकरणाचा तपास करून डॉ. खजुरगी यांच्यावर गुन्हा दाखल

सोलापूर : कोरोना संशयित रुग्णांना स्वॅब टेस्ट देण्यासाठी पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात न पाठविल्याप्रकरणी कर्णिकनगर येथील डॉ. शशिकांत खजुरगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हे दुसरे प्रकरण आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी या क्लिनिकला भेट देऊन तपासणीअंती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनासदृश आजाराचे रुग्ण  खासगी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी जात आहेत. उपचारानंतरही बरे होत नसल्याने इतर रुग्णालयांमध्ये फिरत आहेत. एखाद्या डॉक्टरकडे कोरोनासदृश रुग्ण तपासणीसाठी आल्यास त्याला महापालिकेच्या स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये पाठविण्यात यावे, अन्यथा त्याच्यावर कारवाई होईल, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेचे मजरेवाडी येथील नागरी आरोग्य केंद्र, दाराशा प्रसूतिगृह, मुद्रा सन सिटी, बॉईस प्रसूतिगृह आदी ठिकाणी स्वॅब टेस्टची सोय करण्यात आली आहे. खासगी डॉक्टरांनी स्वॅब टेस्ट करण्याचा सल्ला देताना या रुग्णांची नोंद आपल्याकडे ठेवावी, असेही आयुक्तांनी बजावले आहे. 

दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त अजयसिंह पवार, आरोग्य अधिकाºयांनी शहरातील विविध क्लिनिकची पाहणी केली. या पाहणीत कर्णिकनगर येथील डॉ. शशिकांत खजुरगी यांच्या क्लिनिकला भेट देण्यात आली. या भेटीत त्यांच्या कामात अनियमितता आढळली. आपल्याकडे आलेल्या रुग्णांच्या नोंदी नव्हत्या. याशिवाय मनपाकडे अहवालही पाठविण्यात आलेले नव्हते. या प्रकरणाचा तपास करून डॉ. खजुरगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पी. शिवशंकर यांनी दिले. यल्लप्पा पल्लेलू यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

तीन जणांना नोटीस आपल्या रुग्णालयांनी कोरोनासदृश रुग्णांबाबतची माहिती मनपाच्या नियंत्रण कक्षाला आणि आरोग्य विभागाला न कळविल्याबद्दल डॉ. मोनाली देशमुख (अवंतीनगर), डॉ. नफिसा शेख (नीलमनगर), डॉ. अमोल देशमुख (अवंती नगर) यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा समाधानकारक नसेल तर या तिघांवरही कारवाई होईल, असा इशारा उपायुक्त धनराज पांडे यांनी दिला.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी