कर्मवीरांची जन्मभूमी असलेल्या चारेत दुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:37+5:302021-01-13T04:56:37+5:30
जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते संजय पाटील विरुद्ध पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते सुंदरराव जगदाळे या एकाच भावकीतील पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ...

कर्मवीरांची जन्मभूमी असलेल्या चारेत दुरंगी लढत
जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते संजय पाटील विरुद्ध पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते सुंदरराव जगदाळे या एकाच भावकीतील पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गावात नऊ जागांसाठी दुरंगी लढत होत आहे. ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून पाटील गटाचे वर्चस्व आहे. त्याला यंदा जगदाळे यांनी आव्हान दिले आहे. चारे हे तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असून, या गावाने तालुका, जिल्हास्तरावर नेतृत्व करणारे नेते दिले आहेत. टी. एन. पाटील यांनी दहा वर्षे जि. प.च्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापतिपद भूषविले. त्यानंतर त्यांचे पुतणे संजय पाटील यांनी जि. प.चे विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. आता त्यांचे विरोधक सुंदरराव जगदाळे यांच्याकडे पंचायत समितीचे विरोधी पक्षनेतेपद आहे. मागील दहा वर्षांपासून संजय पाटील यांचा राजकारणात उदय झाला व त्यांनी ग्रामपंचायत ताब्यात घेतली. त्याला मागील पाच वर्षांपासून गाव व तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या सुंदरराव जगदाळे यांनी पंचायत समितीत तर यश मिळवलेच, मात्र आता पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांनी ग्रामविकास आघाडी पॅनेल तयार करून नऊ उमेदवार उभे केले आहेत. पाटील यांच्या कर्मवीर ग्रामविकास आघाडीने देखील नऊ जागी उमेदवार दिले आहेत. याशिवाय वंचित आघाडीचे दोन, तर एका अपक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. गावात तीन प्रभाग आणि नऊ जागा आहेत. १८६८ इतके मतदार आहेत. जगदाळे आणि पाटील या दोघांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.