उजनीत शेतीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST2021-09-24T04:26:23+5:302021-09-24T04:26:23+5:30

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गटातील फिर्यादी अण्णासाहेब हनुमंत लोकरे (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मण बाबासाहेब भिसे, बाबासाहेब ...

Fighting between two groups due to farming in Ujjain | उजनीत शेतीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

उजनीत शेतीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गटातील फिर्यादी अण्णासाहेब हनुमंत लोकरे (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मण बाबासाहेब भिसे, बाबासाहेब भगवंत भिसे, भगवंत पांडुरंग भिसे, रामा बाबासाहेब भिसे, लक्ष्मणची आई (सर्व रा. उजनी (मा)) यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता फिर्यादीच्या शेतात एकत्र येऊन विठ्ठल जाधव यांच्याकडून ‘तू ही जमीन का घेतली आहेस’, असे म्हणून ‘आम्हाला तू जादा पैसे नाही दिलेस, तर तुला आम्ही या जमिनीत वहिवाट घालू देणार नाही. तू अगोदर पैसे दे मगच रानात पाऊल ठेव नाहीतर आम्ही तुझा पाय मोडून टाकून जीवे मारू’, असे म्हणून काठीने व ऊसतोडीच्या कोयत्याने मारहाण केली. याबाबतचा तपास एएसआय पाटील करत आहेत.

तर दुसऱ्या गटातील फिर्यादी लक्ष्मण बाबासाहेब भिसे (वय २५, रा. उजनी (मा)) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अण्णासाहेब हनुमंत लोकरे, विनोद हनुमंत लोकरे, तानाजी नानासाहेब लोकरे, शिवाजी नानासाहेब लोकरे, नवनाथ विलास लोकरे (सर्व रा. उजनी (मा)) यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता फिर्यादीच्या शेतात एकत्र येत ऊसतोडीचा लोखंडी कोयता वापरत फिर्यादी रस्त्यांची मोजणी करत असताना सर्व आरोपींनी जातीवाचक बोलून ‘तुमचे रस्ता मोजण्याचे कारण काय?’ असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबतचा तपास उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे हे करत आहेत.

.............................

Web Title: Fighting between two groups due to farming in Ujjain