सत्तावन्न वर्षे गुण्यागोविंदानं नांदले; जगाचा निरोपही घेतला एकाच दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:47+5:302021-08-21T04:26:47+5:30
सीमिता या गेल्या काही दिवसांपासून आजारीच होत्या. गुरुवारी त्यांचे पती प्रल्हाद चव्हाण हे शेतात केले होते. दुपारी दीडच्या सुमारास ...

सत्तावन्न वर्षे गुण्यागोविंदानं नांदले; जगाचा निरोपही घेतला एकाच दिवशी
सीमिता या गेल्या काही दिवसांपासून आजारीच होत्या. गुरुवारी त्यांचे पती प्रल्हाद चव्हाण हे शेतात केले होते. दुपारी दीडच्या सुमारास सीमिता यांनी अखेरचा श्वास घेतला. पती शेतात होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते घरी आले. तेव्हा त्यांना आपल्या पत्नीचे निधन झाल्याचे कळल्यानंतर त्यांचा धक्काच बसला आणि खाली कोसळले. काही वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचेही निधन झाले. त्यांना कोणताही आजार नव्हता. मात्र, आयुष्यभर साथ दिलेल्या पत्नीच्या निधनाची वार्ता ते सहन करु शकले नाहीत. त्या धक्क्यातूनच त्यांचा मृत्यू झाला.
एकाच दिवशी पती व पत्नी दोघेही जगाचा निरोप घेतल्याने झानपूर गावातच नव्हे, पंचक्रोशीतही हळहळ व्यक्त होत आहे. त्यानंतर, दोघांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढत गावातील समशानभूमीत एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
..............
एकाच दिवशी जगाचा निरोप
प्रल्हाद चव्हाण हे २० वर्षांचे असतानाच, त्यांचा सीमिता यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर, दोघेही एकमेकांना साथ शेती करीत आनंदाने संसाराचा गाडा हाकला. तब्बल ५७ वर्षे संसार केले आणि अखेर एकाच दिवशी दोघे जगाचा निरोप घेतला. प्रल्हाद चव्हाण हे गावचे माजी सरपंच होते.
(फोटो २० बार्शी सीमिता व प्रल्हाद चव्हाण)