शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण तहसील कार्यालयातील तपासणीत चार गावांत सापडल्या पंधरा कुणबी नोंदी

By दिपक दुपारगुडे | Updated: November 11, 2023 18:52 IST

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मकता दाखवली.

सोलापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मराठा समाजाने कुणबी नोंदी असलेले पुरावे शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यात दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात गेल्या पाच दिवसांपासून रेकॉर्ड विभागात जन्म-मृत्यू नोंदणी, क.ड.ई पत्रक, लोकसंख्या रजिस्टर, सर्वे नंबर उतारे असे १८०१ पासूनचे कुणबी नोंद असलेले पुरावे शोधकाम पाच दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान चार गावांत १५ कुणबी नोंदी आढळून आल्या.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मकता दाखवली.

त्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात आवश्यक जुने दस्तावेज उपलब्ध करण्याच्या दृष्टीने दक्षिण तहसील कार्यालयात तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन केला. या ठिकाणी तहसीलमध्ये नक्कल विभागात उपलब्ध असलेल्या सर्व गावांच्या दप्तराची तपासणी सुरू केली. यासाठी नोडल अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांची नियुक्ती केली. यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. या समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक (उत्पादन शुल्क), उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपनिबंधक सहकारी संस्था, मुख्याधिकारी यांचा यामध्ये समावेश केला.

चार गावांत आढळल्या नोंदीदक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी-२, मुळे- १, चिंचपूर-८, वडजी-४ अशा एकूण -१५ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. कुणबी, कुणबी- मराठा किंवा मराठा- कुणबी या संदर्भांतील कागदपत्रे उपलब्ध असतील तर त्याची वैधता तपासणीसाठी घेऊन तहसील कार्यालयात यावे. कागदपत्रे मोडी लिपितील असतील तरी तपासून घेण्यात येतील, असे अवाहन तहसीलदार अमोल जमदाडे यांनी केले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkunbiकुणबीSolapurसोलापूर