मोहोळमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा निर्भय मॉर्निंग वॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:56+5:302021-08-21T04:26:56+5:30
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी ...

मोहोळमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा निर्भय मॉर्निंग वॉक
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी सूत्रधार अद्यापही मोकाट आहे. लवकरात लवकर या खुनामागील सूत्रधारांना पकडून त्यांना शासन होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे यांनी यावेळी केली. यावेळी राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद, जिल्हा कार्याध्यक्ष धनराज चवरे, अनिल कोरे, श्रीधर उन्हाळे, बिरमल खांडेकर, मोहन कादे, संजय भोसले, संदीप साळवे, मनोहर गोडसे, रमेश साठे, बाळासाहेब जाधव, मानाजी थोरात, नेहा भोसले, व्यंकटेश भोसले, योगेश्वरी भोसले, विजयकुमार चांदणे आदी उपस्थित होते.
----
फोटो : २० मोहोळ
मोहोळमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा निर्भय मॉर्निंग वॉक करताना उपस्थित मान्यवर.