चाकूचा धाक दाखवून पावणेतीन लाखांचा कॅमेरा चोरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST2021-02-05T06:43:42+5:302021-02-05T06:43:42+5:30
याबाबत फोटोग्राफर कन्हैया डमरे यांनी शहर पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. याबाबत अधिक ...

चाकूचा धाक दाखवून पावणेतीन लाखांचा कॅमेरा चोरला
याबाबत फोटोग्राफर कन्हैया डमरे यांनी शहर पोलिसांत अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. याबाबत अधिक माहिती अशी १२ जानेवारीला केतन पुनामिया नामक व्यक्तीचे फोटो शूट करण्यासाठी फिर्यादीला फोन आला; पण सध्या लग्नाचा सिझन असल्याने शूट करण्यास वेळ नाही, असे फिर्यादीने अनेकवेळा फोनवरून सांगितले. अखेर ठरले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने फिर्यादीला कॅन्सर हॉस्पिटलच्या मागे छान लोकेशन आहे तेथे काढू असे सांगून दोघेही गेले. फोटो शूटचे काम करीत असताना एकाने अंगावर शाल टाकून येऊन काय करता असे विचारले. त्यावर फिर्यादीने फोटो काढतो असे म्हणताच ‘तुझा कॅमेरा मला दे म्हणून अंगावर येऊन चाकूचा धाक दाखवून झटपट करून जबरदस्तीने कॅमेरा व त्याचे साहित्य घेऊन फिर्यादीच्या दुचाकीसह पळून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेशवर केदार करीत आहेत.
----