बाप-लेकांनी केली आत्महात्या

By Admin | Updated: March 28, 2017 16:44 IST2017-03-28T16:44:00+5:302017-03-28T16:44:00+5:30

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर निधनाचे दु:ख सहन न झाल्याने दु:खावेगात पतीने आपल्या सात वर्षीय मुलासह रेल्वेखाली पडून आत्महत्या केली़

The father-in-law committed suicide | बाप-लेकांनी केली आत्महात्या

बाप-लेकांनी केली आत्महात्या

ऑनलाइन लोकमत
मोहोळ, दि. 28 : पहिल्या पत्नीच्या निधनानंतर निधनाचे दु:ख सहन न झाल्याने दु:खावेगात पतीने आपल्या सात वर्षीय मुलासह रेल्वेखाली पडून आत्महत्या केली़ हा प्रकार मोहोळ ते सोलापूर रेल्वे मार्गावर वडवळ शिवारातील पवार वस्तीजवळ घडली़ नागनाथ दादाराव सावंत ( घरबुडे वय ३५) व अजिंक्य नागनाथ सावंत ( घरबुडे ) वय ७ रा . शिरापुर ( सो) अशी मृतांची नावे आहेत़
या बाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नागनाथ सावंत याची पहिल्या पत्नी चे सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते़ त्यानंतर नागनाथ सावंत याचे पुन्हा दुसरा विवाह ही करण्यात आला होता. पण तो आपल्या मनातुन पहिल्या पत्नीचे प्रेम विसरू शकला नाही. त्या नैराश्यातून मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी आपल्या घरी गुढी उभा करून मुलगा अजिंक्य ला सोबत घेऊन वडवळ येथील श्री नागनाथ महाराज यांचे दर्शन करण्यासाठी घेतले़ दर्शन केल्या नंतर वडवळ शिवारातील पवार वस्ती जवळ सकाळी दहाच्या सुमारास जाऊन रेल्वे रुळावर रेल्वेच्या खाली पडून मुलासह आत्महत्या केली. आत्महत्या करते वेळी वडिलांनी लहान मुलास घट्ट असे पकडले असल्याचे छिन्नविच्छिन्न झालेल्या दोघांचा ही मृतदेह पहिल्यानंतर दिसत होते़ त्या ठिकाणी पाहणाऱ्या नागरिक व परिसरातील नागरिक यांचेकडून हळहळ व्यक्त केली जात होती. याबाबत साधू प्रभू घरबुडे (रा .शिरापुर) यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोकरे करीत आहेत.

Web Title: The father-in-law committed suicide