शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलीस सासरी सोडायला निघालेला पिता कार-टेम्पो अपघातात ठार, मुलगी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 22:48 IST

डोक्याला मार लागून मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोलापूर  : मुलीला सासरी सोडण्यासाठी निघालेल्या पित्याच्या कारला टेम्पोची समोरून जोरदार धडक बसली. या अपघातात वडीलांचा जागीच मृत्यू झाला. तर डोक्याला मार लागून मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरेश मारुती बोबलादे (वय ५४, रा. लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा) असे मृत पित्याचे नाव असून हा अपघात गुरुवार २९ जून रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास सांगोला - जत रोडवर सोनंद येथे चव्हाण मळा परिसरात घडला. या अपघातात त्यांची मुलगी भक्ती प्रभू संक्रट्टी (वय १९, रा. बाळेगिरी, ता.अथणी, जि.बेळगाव) ही जखमी झाली असून तिच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी बोबलादे यांचा मुलगा शुभम सुरेश बोबलादे (रा. लक्ष्मीदहिवडी) याने फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सुरेश बोबलादे यांची मुलगी भक्ती हिचा २९ मे रोजी बाळगिरी (ता.अथणी) येथील प्रभू संक्रट्टी यांच्याशी विवाह झाला होता. विवाह नंतर मुलगी माहेरी आली होती. तिला सासरी सोडण्यासाठी गुरुवार, २९ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास वडील सुरेश बोबलादे हे कार (एम. एच. १३/ बी. एन. ५७६३) घेऊन लक्ष्मी दहिवडी येथून सांगोला मार्गे बाळेगिरीला निघाले होते. त्यांची कार सांगोला-जत रोडवरुन सोनंदजवळील चव्हाण मळा परिसरात आली असता भरधाव वेगातील टेम्पो (एम. एच. १०/ ए. ५९१५) ने समोरून जोराची धडक दिली. अपघातातील टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

या अपघातात पुढच्या दोन्ही सीटवर बसलेले सुरेश बोबलादे व मुलगी भक्ती हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर टेम्पो मालकानेच उपचाराकरिता दोघांना सांगोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. सुरेश बोबलादे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूरcarकार