वाढेगाव रस्त्यावरील अपघातात पिता ठार, मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:57+5:302021-01-13T04:56:57+5:30

हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास सांगोला-वाढेगाव रस्त्यावर माणनदी पुलाजवळ घडला. श्रीपाद दिगंबर कुलकर्णी (वय ५२, रा. कडलास ...

Father killed, daughter injured in road accident | वाढेगाव रस्त्यावरील अपघातात पिता ठार, मुलगी जखमी

वाढेगाव रस्त्यावरील अपघातात पिता ठार, मुलगी जखमी

हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास सांगोला-वाढेगाव रस्त्यावर माणनदी पुलाजवळ घडला. श्रीपाद दिगंबर कुलकर्णी (वय ५२, रा. कडलास रोड, सांगोला महाविद्यालय परिसर) असे जागीच मृत्यू पावलेल्या पित्याचे नाव आहे. श्रुती श्रीपाद कुलकर्णी (१९) असे जखमी मुलीचे नाव आहे.

याबाबत सांगोल्यातील कडलास रोड येथील श्रीपाद कुलकर्णी हे मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मोपेड (एमएच ४५ - एल ४५४९) वरून मुलगी श्रुती हिला सोबत घेऊन वेळअमावास्यानिमित्त सांगोला तालुक्यात मेडशिंगी येथील शेताकडे निघाले होते. दरम्यान, सोलापूरहून वेगात निघालेला मालट्रक (टीएस ०७, यूएफ ९६९०) वाढेगावमार्गे मिरजकडे निघाला होता. दोन्ही वाहने सांगोला वाढेगाव रोडवरील माणनदी पुलाजवळ आली असता समोरासमोर धडक झाली. जखमी श्रीपाद कुलकर्णी व श्रुती कुलकर्णी या दोघांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. श्रीपाद यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनील सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Father killed, daughter injured in road accident