Father commits suicide by crushing two stomachs under truck | पोटच्या दोन लेकींना ट्रकखाली चिरडून पित्याची आत्महत्या

पोटच्या दोन लेकींना ट्रकखाली चिरडून पित्याची आत्महत्या

करमाळा : प्रेम प्रकरणाच्या संशयावरून दोन मुलींना ट्रकखाली चिरडून पित्याने आत्महत्या केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदोरी (ता. मावळ) येथे घडला.

नंदिनी भराटे (१८), वैष्णवी भराटे (१४) व भरत भराटे (४५), अशी मृतांची नावे आहेत. हा धक्कादायक प्रकार इंदोरी (ता. मावळ, जि. पुणे) येथे दि. १७ च्या मध्यरात्री उघडकीस आला. याप्रकरणी मृत मुलीची आई सपना भरत भराटे (रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सध्या हे कुटुंब मावळ (जि. पुणे) तालुक्यात इंदोरी येथे अल्फानगरी सोसायटीत राहते.

या धक्कादायक घटनेमुळे इंदोरी परिसरात खळबळ उडाली आहे. भराटे कुटुंबीय मूळचे करमाळा तालुक्यातील सावडी येथील आहे. ते कामधंद्याच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात वास्तव्यास होते.

स्वत:च्या मुलीचे कोठे तरी बाहेर प्रेम प्रकरण सुरू आहे, असा संशय भरत भराटे याला होता. मुलीच्या अशा वागण्याने नाव खराब होईल, यापेक्षा जीव दिलेला बरा, असे त्याने या घटनेपूर्वी पत्नी सपनाला सांगितले होते. भरत भराटे यांनी दोन्ही मुलींना रात्री रस्त्यावर झोपण्यास सांगितले. स्वतःच्या मालकीचा ट्रक (एमएच १२ एचडी १६०४ ) चालू करून दोन्ही मुलींच्या अंगावर घालून त्यांना चिरडून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतः देखील चालू ट्रकखाली उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

फोटो मेल केला आहे.

Web Title: Father commits suicide by crushing two stomachs under truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.