तरुणीचा विनयभंग करून वडिलांस मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:31+5:302021-01-17T04:20:31+5:30

तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयीन तरुणी सार्वजनिक विहिरीवर पाणी आणण्यासाठी १५ जानेवारी रोजी दुपारी गेली होती. तेव्हा उमेश खोत ...

Father beaten for molesting young girl, five charged | तरुणीचा विनयभंग करून वडिलांस मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

तरुणीचा विनयभंग करून वडिलांस मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

Next

तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयीन तरुणी सार्वजनिक विहिरीवर पाणी आणण्यासाठी १५ जानेवारी रोजी दुपारी गेली होती. तेव्हा उमेश खोत याने दुचाकीवरून तेथे येऊन विनयभंग केला. तसेच त्याचा मित्र पांडुरंग आमले याने त्याच्या मोबाईलवरून पीडित तरुणीला मेसेज टाकून त्रास दिल्याबद्दल दोघावर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली.

दरम्यान, दुपारी घडलेल्या घटनेनंतर पीडित तरुणीचे वडील मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जाताना तुम्ही झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार देऊ नका असे म्हणत त्यांना उमेश लक्ष्मण खोत, राजू मच्छिंद्र खोत, बारीकराव मच्छिंद्र खोत, रमेश लक्ष्मण खोत, लक्ष्मण यंकु खोत या पाच जणांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वरील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशितोष चव्हाण करीत आहेत.

Web Title: Father beaten for molesting young girl, five charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.