शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

घरातच गुटखा तयार करणाऱ्या पिता-पुत्रास अटक; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:40 IST

उपळवाटे येथील घटना; आठ लाखांचा ऐवज जप्त, गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील उपळवाटे येथील एका राहत्या घरावर छापा टाकून टेंभुर्णी पोलिसांनी सुमारे ४ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा गुटखा  व तो तयार करण्यासाठी लागणारे ३ लाख १३ हजार रुपये किंमतीचे साहित्य असा एकूण ८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पिता - पुत्रास अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक दयानंद गावडे व सपोनि राजेंद्र मगदूम  यांच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास केली आहे.

कोणत्याही परवान्याविना अवैधरित्या नबाब ब्रँडचा गुटखा घरातच तयार करणाऱ्या पोपट काशिनाथ भोसले (वय ४७) व त्याचा मुलगा शंकर पोपट भोसले (वय१९)  रा. उपळवाटे (तालुका माढा) येथील पिता पुत्रांना टेंभुर्णी पोलिसांनी रंगेहात पकडून मुद्देमालासह अटक केली आहे .या प्रकरणामध्ये निमगाव (टें) येथील चंद्रकांत ज्योतीराम क्षारसागर यांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की टेंभुर्णी पोलिसांना उपळवाटे येथील एका राहत्या घरातच गुटखा तयार करत असल्याची खबर मिळाली होती .खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोनि दयानंद गावडे व सपोनी राजेंद्र मगदूम यांच्या पथकाने पंचांसह शनिवारी सकाळी ८.५० वा. उपळवाटे येथील पोपट भोसले यांच्या घरावर छापा टाकला. पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेतली असता एका खोलीत वरील मुद्देमाल आढळून आला. यावेळी पोपट भोसले याने सांगितले की हा सर्व माल निमगाव (टें) येथील चंद्रकांत ज्योतीराम क्षिरसागर यांचा असून त्यांनी आमच्या घरातील एक खोली दरमहा ५००० हजार रुपये भाड्याने घेतली होती. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सपोनी राजेंद्र मगदूम हे करीत आहेत . 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी