शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील शेतकºयास बाजार समितीत अडत्याकडून मारहाण; अडत्याला परवाना रद्दची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:10 IST

सोलापूर बाजार समिती ; दुकान गाळा ताब्यात घेण्यासाठी संचालक मंडळासमोर विषय

ठळक मुद्देया अडत्याला सोलापूर बाजार समितीने परवाना रद्द करण्याची कारवाईची नोटीस बजावलीपरवाना रद्द करून दुकानाची जागा ताब्यात घेण्यासाठी ठरावही घेण्यात येणारचांगला कांदा उत्पादनासाठी कष्ट घेणाºया शेतकºयाला त्रास

सोलापूर:  कांद्याच्या पोत्यावर झोपी गेलेल्या व गोंधळ ऐकून उठून बसलेल्या शेतकºयाला नाहक मारहाण केल्याप्रकरणी फारुक हबीबल्ला बागवान (मोसंबीवाले अँड कंपनी) या अडत्याला सोलापूरबाजार समितीने परवाना रद्द करण्याची कारवाईची नोटीस बजावली. परवाना रद्द करून दुकानाची जागा ताब्यात घेण्यासाठी ठरावही घेण्यात येणार असल्याचे सचिव मोहन निंबाळकर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील जागजीच्या रामकृष्ण बाबुराव सावंत यांनी ५० पाकीट कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये श्री विष्णुनारायण ट्रेडर्स यांच्याकडे आणला होता. रामकृष्ण सावंत हे पोत्यावरच झोपले होते. रात्रीच्या वेळी गोंधळ ऐकून रामकृष्ण सावंत हे जागे झाले. जागे झालेल्या रामकृष्ण सावंत यांना  इब्राहिम फारुक बागवान यांनी शिवीगाळ व मारहाण करु लागले. रामकृष्ण सावंत हे श्री विष्णुनारायण ट्रेडर्सचे चालक विक्रम पाटील यांच्याकडे तक्रार करू लागल्यानंतर त्यांनाही इब्राहिमने मारहाण केली.

फारुक हबीबल्ला बागवान यांच्या नावे फळे व भाजीपाला विभागातील सी-११ हा गाळा असल्याने व मारहाण करणारा इब्राहिम हा त्यांचा मुलगा असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. बाजार समितीने दिलेल्या नोटिसीमध्ये आपला मुलगा इब्राहिम यांच्याकडून वारंवार अशा तक्रारी होत असल्याचे म्हटले आहे. यामुळे महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) आपला परवाना रद्द करुन गाळा ताब्यात का घेऊ नये? असे नोटिसीमध्ये म्हटले आहे. याबाबत बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत परवाना रद्द व गाळा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यासाठी विषय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

रामकृष्ण सावंतांचा कांदा नं.१- मारहाण झालेल्या जागजीच्या रामकृष्ण सावंत या शेतकºयाचा कांदा १४०० रुपयाने विक्री झाला. सोमवारी सोलापूर बाजार समितीमध्ये विक्री झालेल्या एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १४०० ते १५०० रुपयांचा दर मिळाला.  यात राम सावंतांचाही कांदा नंबर-१ होता. चांगला कांदा उत्पादनासाठी कष्ट घेणाºया शेतकºयाला त्रास झाल्याचे तेथे शेतकरी बोलत होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारFarmerशेतकरीonionकांदा