शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

शेतकऱ्यांची घाई; सोयाबीनला पावसाचा कहर, अशात वाढले मजुरीचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 11:58 IST

मळणीसाठी मशीनला आहे वेटिंग

सोलापूर : पावसाचा कहर अशात काढणीला आलेला सोयाबीन हातचे जाण्याची भीती. बाजारात भाव कोसळलेला असतानाही इकडे मजुरीत मात्र दुपटीने वाढ झाल्याने शेतकऱ्यांवरील संकटे काही कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सोयाबीन काढणीला असतानाच परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. त्यामुळे शेतात तळी साचली असून, सोयाबीन हातचे जाण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे चिखलात हाती लागेल ते पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई सुरू केली आहे. सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने साहजिकच मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. इकडे गेल्या महिन्यात प्रति क्विंटलला १२ हजारांवर गेलेला भाव आता निम्म्यावर आला आहे. मात्र, मजुरीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली आहे. काढणी झाली तरी मळणी करण्यासाठी मशीनला वेटिंगवर राहावे लागत आहे. डिझेल दरात भरमसाट वाढ झाल्याने मळणीच्या दरातही २५ ते ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

काढणीचे असे आहेत दर

  • पुरुष मजुरी : ५००
  • महिला मजुरी : ३५०
  • एकरी काढणी : ४५००

मजूर मिळेनात...

जिल्ह्यात बार्शी, उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ तालुक्यांत सोयाबीनचे पीक आहे. सध्या सर्वत्र पीक काढणीत असल्याने मजुरांची वाणवा आहे. पूर्वी पुरुष मजुरांना ३५०, तर महिलांना २०० रोजगार होता. एकरी ३५०० हजाराला गुत्ता होता तो आता ४५०० झाला आहे. आता चिखलात सोयाबीनची काढणी करावी लागत असल्याने वाढवून दर द्यावे लागत आहेत. याशिवाय मजूर आणण्यासाठी वाहन पाठवावे लागते.

शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार...

सोयाबीनला चांगला भाव मिळतो म्हणून लागवड केली. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने पीक जेमतेम आले. आता पीक काढणीला असताना पावसाने जोर केला आहे. हाती आलेले पीक जाऊ द्यायचे नाही म्हणून मजुरी वाढलेली असली तरी पीक काढणे क्रमप्राप्त आहे. अशात सोयाबीनचे भाव पडले आहे.

- विठ्ठल साठे, शेतकरी

पीक काढणीला असतानाच पावसाने जोर केला. त्यामुळे हातचे आलेले पीक जाऊ नये म्हणून एक हजार वाढवून गुत्ता दिला आहे; पण सोयाबीनचे दर पडले आहेत. दिवाळीच्या तोंडावर महागाई असताना शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. डिझेलदरवाढीने मळणीचे दर वाढविण्यात आले आहेत.

- श्रीराम चव्हाण, शेतकरी

जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • उ. सोलापूर : ४८६५
  • द. सोलापूर : ३७६४
  • बार्शी : ४९२७३
  • अक्कलकोट : ५९२५
  • मोहोळ : ४१४६
  • माढा : ०२६
  • करमाळा : ००६
  • पंढरपूर : ११४
  • सांगाेला : ००९
  • माळशिरस : १३४
  • मंगळवेढा : ०२९
टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी