पंढरपूर प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:48 IST2021-02-05T06:48:03+5:302021-02-05T06:48:03+5:30
फोटो : पंढरपूर प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे उपोषण करताना कुबेर घाडगे. पंढरपूर : जिल्हाधिकारी व न्यायालयाने हुकूमनाम्यामध्ये एक ...

पंढरपूर प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे उपोषण
फोटो : पंढरपूर प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे उपोषण करताना कुबेर घाडगे.
पंढरपूर : जिल्हाधिकारी व न्यायालयाने हुकूमनाम्यामध्ये एक वादी व सहा प्रतिवादी असताना कुणाचा वाटप तक्ता तयार करण्याबाबत व नोंद देण्याबाबत आदेश केला होता. या आदेशाची नक्कल मिळावी या मागणीसाठी पंढरपूर प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून कुबेर चिमाजी घाडगे (देगाव, ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे यांनी आमरण उपोषण सुरू केले. प्रशासनाकडून समजूत काढल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
सोमवारी सकाळी शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे हे जवळपास १०० फूट टॉवरवर चढले. सोबत त्यांनी मोबाईल व पिशवी घेतली. अचानक शेतकरी टॉवरवर चढल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. तत्काळ तहसीलदार विवेक साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुगदूम पोहोचले. प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी कुबेर चिमाजी घाडगे यांच्याशी उपोषण स्थगित करण्यासंदर्भात फोनद्वारे विनवणी केली. त्याचबरोबर प्रांत पोलीस बंदोबस्त व अग्निशमन वाहन ठेवण्यात आले.
काही वेळानंतर अधिकाऱ्यांनी कुबेर घाडगे यांची समजूत काढली. यानंतर कुबेर खाली उतरले व त्यांनी उपोषण मागे घेतले.
---