शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांची दिवाळी अंधारातच; पंचनामे पूर्ण व्हायला आणखी दहा दिवस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:10 IST

सोलापूर जिल्हा प्रशासनाची माहिती : अद्याप १० टक्केच पंचनामे पूर्ण

ठळक मुद्देवेधशाळेने पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहेनदीपात्राशेजारील सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला स्थलांतरित बहुतांश नागरिकांना अद्याप निवारा केंद्र न सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे

सोलापूर : अतिवृष्टीमुळे शेकडो गावांमध्ये पुराचे पाणी शिरलंय. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुराचे पाणी आता हळूहळू ओसरते आहे. त्यामुळे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत फक्त दहा टक्केच पंचनामे झाले आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

कृषी सहायक, ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्या संयुक्त पथकाद्वारे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे सुरू आहेत. सुरुवातीला बहुतांश गावांमध्ये पुराचे पाणी तीन ते पाच फुटांपर्यंत असल्याने पंचनामे करताना अनेक अडथळे आलेत. मागील दोन दिवसात पुराचे पाणी ओसरते आहे. त्यामुळे पंचनामे करायला सुरुवात झाली असून यात शेती पिकांचे नुकसान, मृत्युमुखी पडलेले जनावरे, घरांची पडझड, स्थलांतरित नागरिक यांसह इतर अनेक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आली.

अतिवृष्टीमुळे जवळपास साडेआठशेहून अधिक कुटुंबीयांना स्थलांतरित व्हावे लागले. बत्तीस हजारांहून अधिक नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना, खासगी इमारती तसेच मठांमध्ये आश्रय घ्यावा लागला. २२०० हून अधिक घरांची पडझड झाली असून, साडेआठ हजार मोठी आणि छोटी जनावरे दगावली आहेत. सोळा लोक मृत्युमुखी पडले आहेत. जवळपास दीड लाख खरीप पीक क्षेत्र यातून बाधित झाले आहे, अशी नुकसानीची माहिती प्राथमिक तपासणीत समोर आली आहे.

जिल्हा प्रशासन अद्यापही सतर्कवेधशाळेने पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नदीपात्राशेजारील सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. स्थलांतरित बहुतांश नागरिकांना अद्याप निवारा केंद्र न सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुन्हा जोरदार पावसाची सुरुवात झाल्यास नदीशेजारील सर्व नागरिकांना तत्काळ स्थलांतरित होण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. तसेच एनडीआरएफच्या दहा पथकांना तालुक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊसagricultureशेतीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय