शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प, दिलेले पैसेही घेतले परत, हिवाळी अधिवेशनानंतर शासनाने घेतला हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 10:58 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लकसध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र

अरुण बारसकर आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लक असल्याचे कारण पुढे करून शासन जमा करून घेतले आहेत. सध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.मोठा गाजावाजा झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पैशाची तरतूद असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पात्र शेतकºयांसाठीही बँकांना पैसे दिले जात नाहीत. २९ जानेवारीपर्यंत राज्यात एकूण ३० लाख ८६ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. शासनाने आतापर्यंत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा केली असून त्यातील त्रुटी असलेल्या शेतकºयांच्या त्रुटी दूर करुन अचूक याद्याही शासनाकडे बँकांनी दिल्या आहेत. मात्र बँकांकडे पैसे नसल्याने पात्र असलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करता येत नाहीत. हिवाळी अधिवेशनादरम्यान घाईने जिल्हा बँका तसेच राष्टÑीय बँकांना १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची तब्बल ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांची यादी दिली होती. प्रत्यक्षात आवश्यक रक्कम दिली नाही. त्यामुळे पात्र शेतकºयांची यादी असूनही तसेच दीड लाखावरील रक्कम जमा केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. ---------------अचूक याद्याही लटकल्या - राज्यातील ३४ जिल्हा बँका तसेच राष्टÑीयीकृत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची आवश्यकता आहे. ---------------------‘ग्रीन’ यादी तपासणीनंतर पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले. यामध्ये दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व दीड लाखावरील रक्कम कर्ज खात्यावर भरणाºया शेतकºयांचा समावेश आहे.- ग्रीन यादीतील त्रुटी निघालेल्या शेतकºयांच्या याद्या अचूक करुन त्या शासनाकडे पाठविल्या आहेत. या यादीतील शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शासन पैसेही देत नाही व ही पात्र यादी बँकांनाही देत नाही. - राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी (५६ लाख ५९ हजार कुटुंबांनी) कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले. - अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र झाले आहेत. --------------------------सोलापूर जिल्हा बँकेने ‘ग्रीन’ यादी तपासणी करुन १८ हजार ३७० पात्र शेतकºयांची तसेच ‘यलो’ यादीच्या तपासणीत पात्र झालेल्या ३२२४ शेतकºयांची पात्र यादी शासनाला पाठवली आहे. बँकेकडे कर्जमाफीचे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असले तरी तीही रक्कम परवानगी नसल्याने जमा करता येत नाहीत. - राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी