जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करून शेतकरी महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 03:14 PM2019-11-26T15:14:03+5:302019-11-26T15:15:13+5:30

सोलापुरातील घटना; सावकारकीला कंटाळून महिलेने उचलले पाऊल; संबंधित महिलेवर उपचार सुरू

A farmer woman commits suicide after poisoning her at District Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करून शेतकरी महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करून शेतकरी महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे- सावकारकीला कंटाळून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न- दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील महिला- घटनेची नोंद शासकीय रूग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली़

सोलापूर : गहाण ठेवलेली तीन एकर शेती सावकाराने परस्पर विकल्याच्या कारणावरून शेतकरी महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

 सविता दामोदर बानोरे (वय ३५ रा. निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) असे आत्महत्याचा प्रयत्न करणाºया महिलेचे नाव आहे. सविता बानोरे यांच्या या मालकीची निम्बर्गी गावात आठ एकर शेत जमीन आहे. सहा वर्षापूर्वी मुलींच्या लग्नासाठी त्यांनी व त्यांच्या पतीने तुकाराम राठोड या सावकाराकडे तीन एकर जमीन तीन लाख रुपयाला गहाण ठेवली होती. शेतजमीन सोडवून घेण्यासाठी सविता बानोरे व तिचे पती दामोदर बानोरे हे पैशाची तजवीज करत होते.

दरम्यान सावकार तुकाराम राठोड याने तीन एकर जमिनीवर कब्जा करण्यासाठी दामोदर बानोरे यांना मारहाण करून खरेदी खतावर सह्या करून घेतल्या. नंतर तीन एकर शेत दुसºयाला विकून टाकली. याप्रकरणी तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय येथे ते अनेक वेळा तक्रारी अर्ज देण्यात आले होते. मात्र न्याय मिळत नसल्याने सविता बानोरे यांनी मंगळवारी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती स्वत: सविता बानोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

सविता बानोरे तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबतची माहिती कळताच सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, दुय्यम पोलीस निरीक्षक संजय पाटील आदी पोलीस कर्मचाºयांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. सध्या सविता बानोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.



 

Web Title: A farmer woman commits suicide after poisoning her at District Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.