शेतकरी आत्महत्या समिती : एक प्रस्ताव मंजूर
By Admin | Updated: June 10, 2015 13:35 IST2015-06-10T13:32:36+5:302015-06-10T13:35:18+5:30
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये सुनील बिभीषण सुरवसे या शेतकर्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

शेतकरी आत्महत्या समिती : एक प्रस्ताव मंजूर
सोलापूर: जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये सुनील बिभीषण सुरवसे (वय ३५, रा. कापसी, बाश्री) या शेतकर्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. पाच प्रस्ताव निर्णयास्तव होते. यातील फक्त एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ३ वाजता बैठक घेणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या मदत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा जयमाला गायकवाड, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यात प्राप्त ५ प्रकरणांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)