सोलापूरात शेतकरी संघटनेचा किसान क्रांती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:32 IST2017-07-21T13:32:11+5:302017-07-21T13:32:11+5:30
-

सोलापूरात शेतकरी संघटनेचा किसान क्रांती मोर्चा
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीच्यावतीने शुक्रवार २१ जुलै २०१७ रोजी दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान क्रांती मोर्चा काढला़ संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची संपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत़ हा मोर्चा पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यापासून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून सिध्देश्वर प्रशालामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला़ यावेळी या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़
या मोर्चात सुकाणू समितीचे संजय पाटील-घाटणेकर, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते़