शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीच्या दर घसरणीमुळे दागिन्यातील गुंतवणूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:55 IST

चढ्या दरातही खरेदीत वाढ; जुन्या सोन्यावरील जीएसटीला विरोध

ठळक मुद्देमागील १५ दिवसात चांदीचा दर हा ७५ हजारांपर्यंत गेला होताआता ६७ हजारांवर स्थिरावला आहे़ सोन्याचा दर ५६ हजारांवरुन ५३ हजारांवर सट्टा बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याने पुन्हा भाववाढ

सोलापूर : अनेक दिवसांपासून सट्टा बाजारामुळे सुवर्ण बाजार अस्थिर झाला आहे़ परिणामत: सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे़ याचा सोलापूरकरांवर कसलाही परिणाम झालेला दिसून येत नाही़ जेव्हा दर वाढत गेले तेव्हा सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढत गेले़ याबरोबर आज सोन्याचा दर चार हजारांनी तर चांदीचा दर १२ हजारांनी उतरला असला तरी सोलापुरात मात्र गुंतवणुकीचा वेग कायम राहिला आहे.

चांदीत बुधवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी पुन्हा चार हजार रुपयांनी वाढ होऊन ती ६७,५०० रुपयांवर प्रतिकि लोवर पोहोचली आहे़ अशाच प्रकारे सोन्यातही १,७५० रुपयांनी वाढ होऊनही ते ५३,४५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे़ सट्टा बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याने पुन्हा भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

मागील १५ दिवसात चांदीचा दर हा ७५ हजारांपर्यंत गेला होता़ आता ६७ हजारांवर स्थिरावला आहे़ सोन्याचा दर ५६ हजारांवरुन ५३ हजारांवर आला आहे़ तरीही हौशीवंतांची गुंतवणूक कायम राहिली आहे़ महिला दागिन्यात गुंतवणूक करताहेत तर पुरुष मंडळी बिस्कीटसह अनेक सोने प्रकारात गुंतवणूक करताहेत़ याही काळात बिल्वर, पाटल्या, राणीहार, तोडे खरेदी सुरू आहे.

 ‘जीएसटी’बाबत केरळ आग्रही!दरम्यान, केरळात सर्वसामान्यांकडील जुन्या अर्थात तीन वर्षांच्या आतील दागिने विक्रीला काढल्यास ३ टक्के तर त्यापुढील कालावधीतील दागिने विक्रीला काढल्यास २०़८० टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन असून केरळ सरकार याबाबत आग्रही दिसतेय़ आता यावर सराफ व्यावसायिकांमध्ये  विरोध सुरू झाला आहे, असे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमनी यांनी सांगितले.

याहीकाळात दरातील चढ-उताराचा फायदा होतोय़ बँकांक डून ठेवींना व्याजदर कमी मिळतेय़ म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करण्यास सर्वसामान्य घाबरताहेत़ जमीन खरेदीत रक्कम गुंतवली तर ती वाढीव रकमेला विकली जाईल की नाही याबाबत शाश्वती नाही़ उलट पोषक वातावरण आहे़ हा काळ सर्वसामान्यांना प्रोत्साहन देणारा आहे़ आता लग्न सराई खरेदी थांबली आहे आणि गुंतवणुकीकडचा कल वाढला आहे़ - मिलिंद वेणेगूरकर सराफ व्यावसायिक

टॅग्स :SolapurसोलापूरGoldसोनंMarketबाजार