स्वत:च्या पार्टीतील सदस्यालाच सरपंच पद मिळावे यासाठी माजी सरपंचाने केल्या बनावट नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:24 IST2021-02-24T04:24:50+5:302021-02-24T04:24:50+5:30

शशिकला दिलीप चव्हाण यांनी मंगल अर्जुन भोसले यांचेकडून मालमत्ता खरेदी घेतल्याचे दाखविले आहे. सध्या रोपळे गावचे सरपंच पदाचे ...

Fake entries made by the former sarpanch to get the post of sarpanch only to a member of his own party | स्वत:च्या पार्टीतील सदस्यालाच सरपंच पद मिळावे यासाठी माजी सरपंचाने केल्या बनावट नोंदी

स्वत:च्या पार्टीतील सदस्यालाच सरपंच पद मिळावे यासाठी माजी सरपंचाने केल्या बनावट नोंदी

शशिकला दिलीप चव्हाण यांनी मंगल अर्जुन भोसले यांचेकडून मालमत्ता खरेदी घेतल्याचे दाखविले आहे. सध्या रोपळे गावचे सरपंच पदाचे

आरक्षण हे अनुसुचित जमाती महिला करीता निघालेले असून रोपळे ग्रामपंचायत मध्ये शशिकला दिलीप चव्हाण या एकटयाच निवडूण आलेल्या

असून त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याने त्यांना त्या पदाचा लाभ घेता येणार नाही व ते रद्द होईल म्हणून सरपंच दिनकर कदम

यांनी खाडाखोड करुन सदरची मालमत्ता मंगल अर्जुन भोसले यांचे नावे दाखवून ती शशिकला दिलीप चव्हाण यांना खरेदी दिल्याचे कागदोपत्री

दाखविले आहे असे म्हणाले. या प्रकरणाची खात्री करुन नवेल यांनी दिनकर नारायण कदम, दशरथ मधुकर कदम, नितीन धनाजी जाधव (सर्व रा.रोपळे,ता.पंढरपूर) यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Fake entries made by the former sarpanch to get the post of sarpanch only to a member of his own party