शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

सोलापूरातील बनावट नोटातील सूत्रधाराचे तेलगीशी होते कनेक्ट, गुन्हे शाखेची माहिती, १९९२ साली त्या दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:10 IST

तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणारा आरोपी जियाउद्दीन दुरुगकर याचे बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी मयत अब्दुल करीम तेलगी याच्याशी संबंध होते.

ठळक मुद्देदोघांविरुद्ध सोलापुरात जेलरोड पोलीस ठाण्यात १९९२ साली फसवणुकीचा गुन्हा आरोपी जियाउद्दीन दुरुगकर हा गेल्या १० वर्षांपासून बनावट नोटा तयार करायचा. त्या व्यवहारात आणण्यासाठी गिºहाईक शोधण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना कामाला लावायचा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १  : तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणारा आरोपी जियाउद्दीन दुरुगकर याचे बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी मयत अब्दुल करीम तेलगी याच्याशी संबंध होते. या दोघांविरुद्ध सोलापुरात जेलरोड पोलीस ठाण्यात १९९२ साली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.  शहरातील शुक्रवार पेठेतील जामा मशिदीच्यामागे जियाउद्दीन दुरुगकर नावाची व्यक्ती एका खोलीमध्ये कलर प्रिंटरच्या मदतीने चलनी नोटांची झेरॉक्स प्रिंट काढून त्या बनावट नोटा व्यवहारात आणणार असल्याची माहिती २३ जानेवारी रोजी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री दुरुगकर याच्या खोलीवर छापा मारला. त्यावेळी खोलीमध्ये प्रिंटरवर प्रिंट काढत असताना दुरुगकर मिळून आला होता. यावेळी खोलीची झडती घेतली असता खोलीत जवळपास १८ लाख रुपयांच्या बनावट नोटा बनविण्याचे साहित्य आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी दुरुगकर यास अटक केली. आरोपी जियाउद्दीन दुरुगकर हा गेल्या १० वर्षांपासून बनावट नोटा तयार करायचा. त्या व्यवहारात आणण्यासाठी गिºहाईक शोधण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना कामाला लावायचा. त्यासाठी तो संबंधितांना ४० टक्के रक्कम द्यायचा. संबंधित माणसे गिºहाईक शोधून त्याच्याशी डील करायचे. त्याची इत्थंभूत माहिती काढायचे आणि मगच दुरुगकर त्यांच्यासमोर जायचा आणि त्यांनी दिलेल्या खºया नोटांच्या बदल्यात तिप्पट नोटा द्यायचा. या काळात त्याचे साथीदार पैशांची देवाण-घेवाण करताना पोलीस आल्याचा आरडाओरडा करून पलायन करायचे. आतापर्यंत त्याने अनेकांना २ लाखांपासून १० लाखांपर्यंत गंडवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. १९९२ साली सोलापुरातील चौघांना घेऊन दुरुगकर हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये तेलगीशी भेटला. त्या चौघांना तेलगी सौदी अरेबियामध्ये जाण्यासाठी पासपोर्ट काढून देतो, असे सांगून त्या चौघांकडून पैसे घेतले. पण त्यांना पासपोर्ट काही काढून दिले नाही. अशी माहिती त्यावेळी फिर्यादींनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी जियाउद्दीन दुरुगकर आणि अब्दुल करीम तेलगी या दोघांविरुद्ध ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ---------------------आरोपी जियाउद्दीन दुरुगकर याच्याकडून फोन लिस्ट मिळाली आहे, त्या फोन नंबरची लिस्ट सायबर सेलकडे दिली आहे. त्याच्याकडून नावे निष्पन्न होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याची पोलीस कोठडी संपली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. - नागनाथ आयलाने सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस