शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला तालुक्यातील १८ बंधारे कोरडे ठणठणीत, पाण्याची गळती रोखण्यात प्रशासनाला आले अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:48 IST

‘देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था सांगोला तालुक्याची झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने तारले; मात्र अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना पाण्याविना मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण व कोरडा नदीवरील १८ बंधारे तुडुंब भरुनही अवघ्या दोन महिन्यातच कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपाण्याची गळती रोखण्यासाठी आलेला ४० लाखांचा शासकीय निधीदेखील पाण्याच्या गळतीबरोबर वाहून गेला की काय? अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. पाटबंधारे अधिकाºयांनी जाणूनबुजून गळतीकडे दुर्लक्ष केल्याने आज नदीकाठच्या गावांना पाणी पाणी करण्याची वेळ आली गळतीसाठी आलेले ४० लाख रुपये कोणाच्या घशात गेले़ याबाबत संबंधित अधिकाºयाची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी केली आहे़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि २३ : ‘देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था सांगोला तालुक्याची झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने तारले; मात्र अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना पाण्याविना मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण व कोरडा नदीवरील १८ बंधारे तुडुंब भरुनही अवघ्या दोन महिन्यातच कोरडे पडले आहेत. पाण्याची गळती रोखण्यासाठी आलेला ४० लाखांचा शासकीय निधीदेखील पाण्याच्या गळतीबरोबर वाहून गेला की काय? अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.यंदा परतीच्या पाऊस दमदार झाल्यामुळे ८ वर्षांनंतर सांगोला तालुक्यातून मार्गक्रमण करणाºया माण नदीवरील १६ व कोरडा नदीवरील २ असे एकूण १८ को. प. बंधारे साठवण क्षमतेच्या ८५ टक्के (१.२५० टी.एम.सी.) पाण्याने तुडुंब भरले होते. बंधाºयातील पाणीसाठा टिकून रहावा. पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रशासन व नदी परिसरातील शेतकºयांनी योग्य ती काळजी घेतली होती, परंतु वर्षानुवर्षे त्याच त्या गंजलेल्या दरवाजातून पाण्याची गळती, बंधाºयाच्या दयनीय अवस्थेसह  शेतकºयांकडून होणाºया पाण्याच्या उपशामुळे अवघ्या दोन महिन्यातच बंधारे कोरडे पडले आहेत. वास्तविक बंधाºयातील पाणी टिकून राहणे, गळतीतून पाणी वाया जाऊ नये यासाठी प्रशासनाने सुमारे ४० लाख रुपये खर्चून गळती काढण्याच्या कामावर खर्च केला़ असे असताना अवघ्या दोन महिन्यातच सर्व बंधारे  कोरडे पडले आहेत. यामुळे येत्या उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. प्रशासनाने निविदा काढून ठेकेदारांकडून गळतीचे काम चोख केले की नाही याची चौकशीसुध्दा करणे गरजेचे आहे. शासन पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते़ तरीही पाण्याची बचत व पाणीसाठा टिकून का राहत नाही याचा हिशोब संबंधित अधिकाºयांकडून घेणे गरजेचे आहे.माण व कोरडा नदीकाठच्या शेतकºयांनी पाण्याची गळती रोखण्यासाठी वेळोवेळी तहसील व पाटबंधारे विभागाला लेखी निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार संजय पाटील यांनी यातील काही बंधाºयाची पाहणी करुन त्यातून गळती होत असल्याचे पाटबंधारे अधिकाºयाच्या निदर्शनास आणून दिले़ शिवाय संबंधित बंधाºयांच्या तातडीने गळती रोखाव्यात अशा सूचना केल्या होत्या, परंतु पाटबंधारे अधिकाºयांनी तहसीलदार व शेतकºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. परिणामी आज बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. याविषयी संबंधित अधिकाºयाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ----------------------गळतीकडे दुर्लक्ष; अधिकाºयांची चौकशी करा- पाटबंधारे अधिकाºयांनी जाणूनबुजून गळतीकडे दुर्लक्ष केल्याने आज नदीकाठच्या गावांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. मग गळतीसाठी आलेले ४० लाख रुपये कोणाच्या घशात गेले़ याबाबत संबंधित अधिकाºयाची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी केली आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी