शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस दांपत्यावर अश्लील भाषेत टीका केली पण आम्ही कोणाला मारहाण केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:13 IST

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा शिवसेनेला सवाल

पंढरपुर : कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खालच्या भाषेत टीका करू नये . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काटेकर यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे . मात्र फडणवीस दांपत्यावर अश्लील भाषेत टीका केली गेली पण आम्ही कोणाला मारहाण केली नाही. त्यामुळे यापुढे अशी घटना खपवून घेतली जाणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी शिवसेनेला दिलाय. 

प्रवीण दरेकर हे शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  पुढे दरेकर म्हणाले, राज्यपालांना विमान परवानगी नाकारणे हा पोरखेळ आहे. घटनात्मक पदाचा अपमान आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेलेली परवानगीची फाइल मुद्दाम बाजूला ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्ताधारी तीन पक्षांची एकाच विषयावर तीन वेगवेगळी विधाने असतात . मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून हे पुढे आले आहे. भाजप सोडून कोणीही जाणार नाही. असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले कार्यकर्ते सरपंच व्हावे यासाठी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत निवडणूकीनंतर घेतली, हे चुकीचं आहे.

सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडण्यास सुरवात केलीय. याविरोधात आम्ही रान पेटवू. सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. पुण्यातील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सत्यता पुढे आली पाहिजे अशी मागणी दरेकरांनी केली.  उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्नेह कायमच सत्तेसोबत असते. ते त्यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर सिद्ध झाल्याची टीका त्यांनी केली.  त्याचबरोबर साखर कारखान्यांना दिलेल्या थकहमीची चौकशी व्हावी अशी मागणीही प्रविण दरेकर यांनी केली आहे.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरpravin darekarप्रवीण दरेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस