शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

फडणवीस सीएम, एकनाथ भाई डीसीएम, शहाजीबापूंचा थेट गुवाहाटीतून गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 10:36 IST

सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचा थेट गुवाहाटीतून गौप्यस्फोट

सोलापूर : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड पुकारलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्याशी त्यांच्या एका कार्यकर्त्याने फोनवरून संपर्क साधला. तेव्हा त्यांनी अनेक गोष्टी उघडपणे बोलून दाखविली. सरकार १०० टक्के बदलणार. फडणवीस सीएम, एकनाथ भाई डीसीएम होणार आहे, अशा गौप्यस्फोट आमदार शहाजी पाटील यांनी केला. कार्यकर्ता आणि आमदार शहाजी पाटील यांच्यातील संभाषण त्यांच्याच शब्दात ऐका.

कार्यकर्ता : नेते, नमस्कार

शहाजी पाटील : नमस्कार नमस्कार

कार्यकर्ता : आहो नेते कुठायं. तीन दिवस झालं फोन लावतोय, फोनच लागत नाही.

शहाजी पाटील : मी सध्या गुहावाहाटीमध्ये आहे.

कार्यकर्ता : बरं...हितं आम्ही टीव्हीवरच आम्ही बघतोय, तुमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाय, पण एवढं घटनाक्रम तुम्ही जरा बोलायंच तर थोडतरी सांगायचं...

शहाजी पाटील : नाय नाय नाय हॅलो...नेत्यांचा आदेश होता. कोणाला फोन करू नका, पण आता ४१ झालं म्हणल्यावर मलाबी करमना म्हटलं तालुक्यात कुणाला तर बोलू. काय चाललंय, काय नाही. बरं पहिलसारखा तालुका कसा हाय?

कार्यकर्ता : सगळं ओके आहे, तुम्ही घेतलेल्या भूमिकेच स्वागत केलं आहे.

शहाजी पाटील : आरे वा वा बर ठीक हाय ठीक हाय...

कार्यकर्ता : पण सर्वांना तुमचा निर्णय महत्त्वाचा आवडलायं...शहाजी पाटील : आरे वा, हॅलो रफीकभाय आता तुम्हाला मी बोलो न्हाय? माणूस बोलत नाही; पण रिझल्ट इतक करेक्ट हाय त्या माणसाचां मलाही वर्षभर नेतृत्व लय आवडलं होतं.

कार्यकर्ता : बरं... बरं पण ते आपल्याला रिस्पेक्टपण भरपूर देत होतं. आपण प्रत्येकवेळी भेटायला गेल्यावर...

शहाजी पाटील : च्यायला काय आपली वळक नाही पाळक नाही, पण त्या माणसानं आल्या आल्या तुम्ही गणपतरावच्या मतदारसंघातून निवडून आलायं. काय बी अडचण सांगा म्हणाले.

कार्यकर्ता : तुम्ही दोघे पहिल्यांदा गेलात का?शहाजी पाटील : पहिल्यांदा इंट्री आमच्या दोघांची झाली, ही लढाई शंभर टक्के जिंकणार. कसाय हे घडतं कशासाठी उद्धव साहेबांना कोणाचाच विरोध नाही. त्यांना प्रत्येक आमदार हा आतासुद्धा देवमाणूस मानतोय देव. माझ्यासहीत सगळ्यांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल एवढा आदर हाय. अडीच वर्षांत आमच्या आमदारक्या राष्ट्रवादी कॉंग्रेस खातंय, उद्या भांडण झालं तर राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ हाणतंय. आम्ही मोकळ राहतोय हीच भावना प्रत्येकाचीय.

कार्यकर्ता : ते आलेत का गोळा किती झालेत? टीव्हीवर कधी ४६, तर काल ४० चा आकडा दाखवतंय...

शहाजी पाटील : शिवसेनेचे जवळ जवळ ४१ झालेत, अजू्न दोघे तिघे वाटेवर आहेत ४५ होतील. अपक्ष एक ७ ते ८ हाेतील. अडीच वर्षे तुम्हाला सांगतो तुमची जवाबदारी काय तालुक्याचा विकास होईल फक्त बघत राहावा. ऐतिहासिक विकास आपल्या तालुक्याचा होणार. इतिहासाला याची नोंद घ्यावी लागणार.

कार्यकर्ता : आता सुद्धा तुम्ही भरपूर काम केलंय, पण अजू्न बरीच कामं शिल्लक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्याचं अजून तसंच राहिलं

शहाजी पाटील : अडीच वर्षे झाली.याला काय पैसे हाय का फंड हाय काय ओ, नुसतं सांगोला उपसा सिंचन योजना याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन हे नाव द्या, तेरा - चौदा पत्रं मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली. जयंत पाटील साहेबांच्या कार्यालयाला पाठवले. कोणी त्याचा विचार करेना.

कार्यकर्ता : तुम्ही परवा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलला होतात ना? मागं बोललात ना दोन महिन्यांपूर्वी...

शहाजी पाटील : स्पष्ट बोलो ना, याला काय खर्च येतंय का? बरं दोन महिने झाले बैठक हाेऊन आता तरी निर्णय कुठाय? बरं त्या बैठकीत आपण सगळे मुद्दे मांडले, साहेबांनी ऐकून घेतले. रिझल्ट कुठाय?

कार्यकर्ता : परवा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रं जी मागितली ते पैसे मिळाले आणि मुख्यमंत्री साहेबांना नगरपालिकेच्या इमारतीसाठी पैसे मागितले.

शहाजी पाटील : इमारात १२ कोटी, काय सुद्धा नाय ओ फक्त तपासून अहवाल सादर करावा. ते घारगे लिहतंय अन् साहेब खाली सही करतंय. साहेबांची अशी ऑर्डर कुठं आहे. तातडीने अंमलबजावणी करावी, खाली उद्धव ठाकरे, धुरळा काढला असता आपण मतदारसंघाचा आतापर्यंत.

कार्यकर्ता : आता कधी घडणार हे सगळं कसं घडणार?

शहाजी पाटील : आता साहेब निर्णय घेणार, साहेबांच्या मनावर हाय. एक सांगतो सरकार १०० टक्के झालं फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला मिळणार.

कार्यकर्ता : आपल्याला काय?

शहाजी पाटील : काय आपल्याला दिलं दिलं,नाय नाय, फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री हाे. फडणवीस अन् आपलं नातं भावा-भावासारखं आहे. एकनाथ शिंदे मला मुलासारखं बघतंय, लयच प्रेमळ नजर हाय त्या माणसाची माझ्यावर हाय...

टॅग्स :SolapurसोलापूरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा