शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस, अजितदादांचे सरकार बहुमत सिद्ध करू शकणारच नव्हते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:42 IST

आधीच होता सोलापूरकरांना विश्वास: महाविकास आघाडीचेच राज्य येणार असल्याचेही भाकित केले होते

ठळक मुद्देफडणवीस, अजितदादा सरकार टिकले तर गरिबांची कामे होतील - गौतम फडतरेमहाराष्ट्रातील जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही -विकास सूर्यवंशी सरकार शेतकरी विरोधी होते़ त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे - अ‍ॅड. राम कदम

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीस व अजितदादांच्या सरकारला चोवीस तासांत विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिल्यावर लोकांच्या मनात काय चालले आहे हे ‘लोकमत’ने मंगळवारी सकाळी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेकांनी हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही अशीच प्रतिक्रिया दिली अन् झालेही तसेच. दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला. 

देवेंद्र फडणवीसअजित पवार यांनी अचानकपणे राजभवनात जाऊन शपथविधी घेतल्यानंतर देशभर पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या सरकारला विश्वासदर्शक ठराव जिंकू देणार नाही असा चंग बांधला. सर्व आमदार एकत्रित केले आणि महाविकास आघाडीचेच सरकार येणार अशी घोषणा केली. दरम्यान, या दोघांच्या शपथविधीला न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाने फडणवीस व अजितदादा यांना चोवीस तासांत विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे बुधवारी या सरकारला विधीमंडळात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार होते. हे सरकार टिकणार का याबाबत सोलापूरकरांच्या भावना जाणून घेतल्या. बहुतेकांनी हे सरकार टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली अन् झालेही तसेच. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी या दोघांनी राजीनामा दिला. 

फडणवीस, अजितदादा सरकार टिकले तर गरिबांची कामे होतील. भाजप सरकारने पाच वर्षांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात केली. सरकारी कार्यालयात शिस्त आणली. त्यामुळे हे सरकार बहुमत सिद्ध करेल व सहा महिने तरी टिकेल असे वाटते़- लुणावत

हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. खरे तर महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही.सत्तेचा जो लपंडाव सुरू आहे, खिचडी सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे जनादेशाचा आदर करून लागू केलेली राष्ट्रपती राजवट कायम ठेवावी. - गौतम फडतरे

फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. हे सरकार शेतकरी विरोधी होते़ त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. हे दोघेही जाणार व महाविकास आघाडीचे सरकार येणार. शिवसेनेचाच विधानसभेवर भगवा फडकविणार असा मला विश्वास वाटतो. -विकास सूर्यवंशी

राज्यात सध्या त्रांगडी स्थिती आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आता थोड्या वेळानंतर एक वेगळीच बातमी येईल अशी स्थिती आहे. त्यामुळे निश्चित काहीच सांगता येत नाही.- अ‍ॅड. राम कदम

भाजपने अवैधपणे अजित पवार यांना हाताशी धरून अचानकपणे शपथविधी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला,पण त्यांचा आनंद फार काळ टिकणार नाही.विधीमंडळात हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार. - तन्मय कदम

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक