वांगीत गारपीट घोटाळ्यास एजंट जबाबदार तक्रारीत तथ्य; चौकशी समितीची कबुली

By Admin | Updated: May 7, 2014 00:41 IST2014-05-05T22:19:02+5:302014-05-07T00:41:37+5:30

नारायण चव्हाण (सोलापूर)-

Facts in the complaint of Agent responsible for hailstorm; Confessions of Inquiry Committee | वांगीत गारपीट घोटाळ्यास एजंट जबाबदार तक्रारीत तथ्य; चौकशी समितीची कबुली

वांगीत गारपीट घोटाळ्यास एजंट जबाबदार तक्रारीत तथ्य; चौकशी समितीची कबुली

नारायण चव्हाण (सोलापूर)-
वांगी (ता. द. सोलापूर) येथे गारपीटग्रस्तांचे पंचनामे चुकीचे झाले़ अनेक शेतकरी वंचित राहिले शिवाय एजंटाने मोठा घोटाळा केल्याचा निर्वाळा चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने आज दिला.
दक्षिण सोलापूर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वांगी येथे कृषी सहायक खमितकर याने पंचनामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या शफीक शेख या खासगी एजंटाने घोटाळा केल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याची कबुली चौकशी समितीने दिली. शेतकर्‍यांनी चौकशी समितीच्या सदस्यांकडून तसे लेखी पत्र घेतले.
एजंट शफीक शेख याने एकाच उतार्‍यावर स्वत:सह भावाच्या नावावर ६५ हजारांचे अनुदान लाटले. दोन हेक्टरची मर्यादा असताना मर्जीतल्या शेतकर्‍यांना चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे करुन मदत मिळवून दिली. पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांकडून रकमा घेतल्या़ गावातील ५० टक्के शेतकर्‍यांचे पंचनामेच केले नाहीत, अशा तक्रारी आल्या होत्या.
जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने आज वांगी येथे जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. ग्रामस्थांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांनी मान्य करताच त्यांच्या सहीनिशी लेखी कबुली जबाब लिहून घेण्यात आला.
पंचनामे केले नसल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ही बाब खरी असली तरी फेर पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे चौकशी समितीचे सदस्य जितेंद्र शेख (मंडल अधिकारी विंचूर), एम. जी. पाटील (कृषी पर्यवेक्षक) यांनी सांगितले.
--------------------------------------
मला कृषी सहायकांनी सांगितल्याप्रमाणे लिहून आणलेल्या माहितीचे पंचनामे केले, फिरुन पंचनामे करण्याची जबाबदारी तलाठी, कृषी सहायकांची होती.
शफीक बाशा शेख अनधिकृत एजंट

गारपीटग्रस्तांच्या अनुदान यादीत काही नावे कॉपीपेस्ट करताना दोन वेळा छापली गेली. ती दुरुस्त केली जाईल.
मारुती खमितकर, कृषी सहायक, वांगी

एकाच सातबारा उतार्‍यावर दोन नावांनी अनुदान लाटल्याच्या तक्रारीत तथ्य आहे. त्याचा अहवाल दोन दिवसांत पाठवू

जितेंद्र मोरे मंडल अधिकारी

Web Title: Facts in the complaint of Agent responsible for hailstorm; Confessions of Inquiry Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.