शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

मारहाण चेहºयावर.. वार मांडीवर; अनैतिक संबंधातून खुनाची शक्यता, सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:17 IST

सोलापूर : आसरा चौक परिसरात शुक्रवारी रात्री खून झालेल्या तरुणाच्या चेहºयावर मारहाणीचे व्रण आढळले असले तरी शस्त्राचे वार मात्र ...

ठळक मुद्देआसरा चौक परिसरात शुक्रवारी रात्री खून झालेल्या तरुणाच्या चेहºयावर मारहाणीचे व्रणकेवळ मांड्यांमध्येच असल्याने अनैतिक संबंधातून खून झाल्याची शक्यतापोलिसांकडून संबंधित घटनेबद्दल अकस्मात मयत असे सांगण्यात येत आहे

सोलापूर : आसरा चौक परिसरात शुक्रवारी रात्री खून झालेल्या तरुणाच्या चेहºयावर मारहाणीचे व्रण आढळले असले तरी शस्त्राचे वार मात्र केवळ मांड्यांमध्येच असल्याने अनैतिक संबंधातून खून झाल्याची शक्यता घटनास्थळी वर्तविली गेली.

दरम्यान, खून झालेल्या तरुणाची पोलिसांकडून तपासणी करताना त्याच्या पँटच्या खिशात १०० रुपये आढळून आले. प्रेताच्या शेजारीच त्याच्या चपला दोन्ही दिशेने पडल्याचे दिसून आले. तरुणाच्या गुप्तांगावरील वार पाहून हा प्रकार अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी चर्चा दबक्या आवाजात बघ्यांपैकी अनेकांकडून ऐकावयास मिळाली. पोलिसांकडून संबंधित घटनेबद्दल अकस्मात मयत असे सांगण्यात येत आहे.

त्याचा चेहरा धुळीने माखला होता. एक हात मोडलेला तसेच  जांघेत तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहिली तरी थेट पोलिसांना सांगण्यास कुणीही पुढे आले नाही. 

घटनेची खबर मिळताच पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहा. पोलीस आयुक्त महावीर सकळे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास काळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला.

 पंचनाम्यानंतर तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला.  तसेच मातीतील रक्ताचे डागही पोलिसांनी हुडकून पंचनाम्यासाठी जप्त केले.

श्वान आले.. अन् घुटमळले- घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. ते ज्या ठिकाणी तरुणाचा मृतदेह होता तेथे आले.. घुटमळले अन् परत फिरले. मातीच्या फुफाट्यामुळे रक्तही मातीत मिसळल्याने काही सापडले नाही. पोलिसांनी तपासणीसाठी माती, तरुणाच्या चपला ताब्यात घेतल्या आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी