शिवसेनेतर्फे ४३६ जणांची नेत्रतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:22 IST2021-03-27T04:22:39+5:302021-03-27T04:22:39+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे उपस्थित ...

Eye examination of 436 persons by Shiv Sena | शिवसेनेतर्फे ४३६ जणांची नेत्रतपासणी

शिवसेनेतर्फे ४३६ जणांची नेत्रतपासणी

येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, मार्केट कमिटीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, अशोक नरसाळे, विशाल घोलप, सचिन जव्हेरी, अतुल बोकन, जयंत दळवी, नागेश शेंडगे, भोसले, वाघमारे, जयंत कोष्टी उपस्थित होते.

ठाणे येथील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. हिरवे यांनी रुग्णांची तपासणी करून रुग्णांना चष्मे दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल डुकरे, डॉ. गर्जे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत अवताडे, युवा सेना तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, महिला तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड, उपजिल्हाप्रमुख मयूर यादव, अमर काळे, दादा तनपुरे उपस्थित होते.

---

२६ करमाळा ब्लड

शिबिरात नेत्रतपासणी करताना डॉ. हिरवे.

Web Title: Eye examination of 436 persons by Shiv Sena