कुसळंबमध्ये ३५५ जणांची नेत्रतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST2021-09-06T04:26:26+5:302021-09-06T04:26:26+5:30

कुसळंब : बार्शी तालुक्यात कुसळंब येथे सरपंच शिवाजी खोडवे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत व राम भाई शहा ब्लॅक ...

Eye examination of 355 people in Kusalamba | कुसळंबमध्ये ३५५ जणांची नेत्रतपासणी

कुसळंबमध्ये ३५५ जणांची नेत्रतपासणी

कुसळंब : बार्शी तालुक्यात कुसळंब येथे सरपंच शिवाजी खोडवे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत व राम भाई शहा ब्लॅक बँक तुमच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर ३५५ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत उपचार करून चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य मनोज गादेकर व माजी सैनिक बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच शिवाजी खोडवे, उपसरपंच किशोर काशीद, विश्वास काशीद, पोलीस कॉस्टेबल आबा शिंदे, संतोष चौधरी, सूर्यकांत काशीद, विजय शिंदे, गुजर शिंदे, गणेश काळे, सोमा खोडवे, सुजित ननवरे, सुनील ननवरे, सुजित शिंदे, भारत काशीद, प्रशांत झांबरे, महिला सीमा शिंदे, जया लोंढे उपस्थित होते.

--------------

फोटो : ०५ कुसळंब

कुसळंब येथे रक्तदान मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करताना मनोज गादेकर व बापूसाहेब शिंदे, किशोर काशीद उपस्थित होते.

Web Title: Eye examination of 355 people in Kusalamba