शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साडेसहा लाखाला गंडा

By विलास जळकोटकर | Updated: May 15, 2024 20:06 IST

अश्लील वर्तन : विनयभंगासह खंडणीचा गुन्हा; आरोपीला पोलिस कोठडी

सोलापूर : ओळखीतून मैत्री झाल्याने भेटीचा गैरअर्थ काढून पीडितेशी अश्लील वर्तन केले आणि एकत्रित काढलेले फोटो नातेवाईक व मित्रांना व्हायरल करतो म्हणून वेळोवेळी तब्बल ६ लाख ५७ हजार ५०० रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार १९ वर्षीय पीडितेने मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. हा प्रकार सप्टेंबर २०२३ पासून आजतागायत घडल्याचे म्हटले आहे. आरोपीविरुद्ध भा.दं.वि. ३५४, ३८४ अन्वये विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा नोंदला आहे.

कृष्णकांत अमर रिजोरा (वय ४३, रा. रुबीनगर, सोलापूर) याला बुधवारी रात्री उशिरा अटक करून बुधवारी न्यायालयात उभे करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला कोठडी संपताच न्यायालयात उभे केले जाणार आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि आरोपीची सप्टेंबर २०२३ मध्ये शहरातील एका महाविद्यालयासमोर ओळख होऊन मैत्री झाली. ते एकमेकांना भेटत असत. या कालावधीत आरोपीचे दोघांचे एकत्र फोटो, व्हिडीओ काढून घेतले होते. दोन महिन्यांपूर्वी त्याने पीडित तरुणीला बोलावून घेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले. यावर पीडितेने त्याला ढकलून दिल्याने तो रागाने निघून गेला.

त्यानंतर आरोपीने पीडितेला फोन करून एकत्र असलेले फोटो, व्हिडीओ मित्रांना व नातलगांना शेअर करतो म्हणून तिला ब्लॅकमेल करू लागला. यामुळे घाबरलेल्या पीडितेकडून आरोपीने ऑनलाइन पद्धतीने ५४ हजार रुपये व सोन्याचे दागिने असे एकूण ६ लाख ५७ हजार ५०० रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.आरोपी आज पुन्हा न्यायालयातपोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन नमूद आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. गुरुवारी पोलिस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयापुढे उभे केले जाणार असल्याचे तपास अधिकारी सपोनि शीतलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी